महात्मा गांधी विद्यालय, कडेगाव येथे NCC ‘A’ प्रमाणपत्र वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
महात्मा गांधी विद्यालय व, श्री. ना.कदम ज्यु कॉलेज कडेगाव येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या (NCC) ‘A’ प्रमाणपत्र वाटप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. 19 महाराष्ट्र बटालियन, कराड या युनिटअंतर्गत येणाऱ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सलग दोन वर्षे — आठवी व नववी वर्गात — खडतर NCC प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना, शिस्त, व स्वावलंबनाचा संस्कार रुजवण्याचे कार्य प्रभावीपणे करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण डी. व्ही. सर, उपमुख्याध्यापक श्री. रोकडे पी. एस सर, पर्यवेक्षक श्री भंडारे के एस सर श्री. शेख बी. एच. सर, तसेच NCC विभाग प्रमुख श्री. पवार एस आर सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांना विविध परेड, व्याख्याने, सामाजिक उपक्रम व शिस्तशीर प्रशिक्षणातून तयार करण्यात आले. 'A' सर्टिफिकेट हे राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त असून, भविष्यातील भरती व करिअरसाठी उपयुक्त ठरणारे आहे.
“NCC प्रशिक्षण हे केवळ परेडपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, नेतृत्वगुण व जबाबदारीची भावना निर्माण करणारे आहे,” असे उद्गार यावेळी प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जनरल बॉडी सदस्य,स्कूल कमिटी सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षक पालक संघ व सर्व ग्रामस्थ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. कदम व्ही. व्ही सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील NCC टीमचे विशेष योगदान लाभले.