अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.


सांगली/कडेगांव.
आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढेच प्रेम ग्रामीण भागात आजही शेतकरी गाईवर करतो. याचे उत्तम उदाहरण सांगली जिल्ह्यातील कडेगांवात पाहायला मिळाले. या गावातील विजय रास्कर या शेतकऱ्याच्या परिवाराने आपली लाडकी गाई 'माऊलीचे' डोहाळ जेवण घालून कडेगांव तालुक्यात एक अनोखा संदेश दिला.

गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात, असे संबोधले जाते. त्याला कारण देशी गाईचे दूध लहान मुलांसाठी अमृता समान असते. तर देशी गाईचे गोमूत्र, शेणाचा सुद्धा वापर औषधी समजला जातो. त्यामुळे या गाईचे महत्त्व समजलेल्या विजय रास्कर,यांच्यासह आनंदराव रास्कर बापु ,गणेश खरात यांना माऊली ही गाय त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक बनली. यामुळे गाईचे सुद्धा डोहाळ जेवण घालण्याचा निर्णय विजय रास्कर यांनी व त्यांच्या रास्कर परिवाराने घेतला.

या अनोख्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी संपूर्ण रास्कर,खरात समाज जमा झाला होता. माऊली या गायीची साडी आणि हार घालून महिलांकडून ओटी भरण्यात आली. मग, गोडधोड खायला घालून तिला ओवळण्यात आले. या कार्यक्रमाला रास्कर कुटुंबातील नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

रास्कर कुटुंबाने शेतकऱ्यांना देशी गाईचे महत्व समजावे. यासाठी हा अनोखा उपक्रम राबवून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. आज ग्रामीण भागातील शेतकरी खिल्लार, गीर जातीचे वाण प्रत्येकी घरटी घेऊ लागल्यामुळे पुढील काळात देशी गाईचे प्रमाणात वाढ होण्यास मदत होणार आहे.यावेळी आनंदराव रास्कर बापु,राहुल रास्कर,गणेश खरात यांच्यासह रास्कर परिवार उपस्थित होता

Popular posts from this blog

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

महात्मा गांधी विद्यालय, कडेगाव येथे NCC ‘A’ प्रमाणपत्र वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला