भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने जागतिक नेत्रदिना निमित्त नेत्रचिकित्सा शिबिर आणि नेत्रदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!!
भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालय कडेगाव जि. सांगली येथे बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी जागतिक नेत्रदिन निमित्त नेत्रचिकित्सा शिबिर आणि नेत्रदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय सांगली येथील नेत्रतज्ञ आणि मेडिकल टीम उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मरणोत्तर नेत्रदान संकल्प फॉर्म भरून जमा केले आणि प्रतिज्ञा घेतली. तज्ञ डॉक्टर डॉ. प्रवीण हंकारे यांनी नेत्रदानाचा उद्देश लोकांना मृत्यूनंतर त्यांचे नियंत्रण नेत्रदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि अंधत्वावर मात करून दृष्टीहीन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणे हा आहे हे विशद केले, तसेच यासाठी कोणत्याही वयाची लिंगाची किंवा रक्तगटाची व्यक्ती नेत्रदान करू शकते अगदी चष्मा असलेली मधुमेह किंवा रक्तदाब असलेले रुग्णही डोळे दान करू शकतात आणि डॉ. कौस्तुभ पाटील यांनी नेत्रदानाचे महत्त्व, तसेच नेत्रदांना विशेष सविस्तर माहिती दिली नेत्रदान कोण करू शकते त्याची प्रक्रिया कधी व कशी होत...