राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग
राष्ट्रीय परिषदेसाठी धनंजय देशमुख, अमोल डांगे यांची निवड.
" हरियाणा येथील राष्ट्रीय परिषदेसाठी
राज्यातून ४८ जणांची निवड."
" राष्ट्रीय परिषदेत धनंजय देशमुख अमोल डांगे यांचा सहभाग."
सांगली/कडेगाव:
शहरी विकास, नागरी सुविधा, जलव्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान आदी विविध विषयांवर चर्चा करणेसाठी संबंधित यंत्रणांनी केलेल्या सादरीकरणाचा नगरपरिषदांच्या कार्यपद्धतीतील नवकल्पनांच्या अभ्यासासाठी भारतीय संसदेमार्फत ‘संविधानिक लोकशाही आणि राष्ट्रनिर्मिती बळकट करण्यासाठी हरियाणा येथील गुरुग्राम येथे राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्रातून ४८ लोक प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनगराध्यक्ष पै. अमोल डांगे यांची निवड झाल्याने कडेगावचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी या राष्ट्रीय परिषदेसाठी सहभाग नोंदवला असून. या परिषदेमध्ये शहरी विकास, नागरी सुविधा, जलव्यवस्थापन, स्वच्छ भारत अभियान आदी विविध विषयांवर संबंधित यंत्रणांनी सादर केलेल्या कार्यपद्धतीचा नवकल्पनांचा अभ्यास करण्याची संधी नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पै.अमोल डांगे यांना मिळणार आहे.
या परिषदेत मिळालेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमता वाढविण्यावर भर देणार असल्याची माहिती कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी. दिली तर परिषदेमुळे राज्यभरातील नागरी स्थानिक संस्थांमधील समन्वय व सहकार्य वाढण्यास मदत होणार असल्याची भावना उपनगराध्यक्ष पै. अमोल डांगे यांनी व्यक्त केली.
गुरुग्राम हरियाणा येथील राष्ट्रीय परिषदेसाठी कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पै.अमोल डांगे यांनी सहभाग नोंदवला.