श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
श्री शिवप्रभु विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
जयमहाराष्ट्र शिक्षणसंस्था संचलीत श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा भव्य सोहळा देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी व मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगेयांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रगीताच्या गजराने विद्यालयातील वातावरण दुमदुमून गेले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्याचा इतिहास, त्याग व बलिदानाची गाथा, तसेच आजच्या पिढीची जबाबदारी यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, स्वातंत्र्य सैनिकांवरील भाषणे विशेषतः लहान मुलांनी सादर केलेले ” हा देश माझा ” हे गीत सर्वांना भावले. यावेळी “भारत माता की जय”च्या घोषणा दिल्या. गावातील स्वच्छता, वृक्षारोपण व पाणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांन खाऊचे वाटप करण्यात आले. वातावरणात देशभक्तीचे रंग पसरले होते, तर मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह व अभिमान झळकत होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण कदम यांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापकांनी मान्यवरांचे आभार मानून केले. कार्यक्रमाला संस्थेचे सचीव प्रा दिपक कुलकर्णी,वसंतराव इनामदार यांच्यासह ’ गावातील सर्व नागरिक, पालक, शालेय शिक्षक, संख्येने उपस्थित होते. शेवटी “जय हिंद, जय भारत”च्या गजरात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव संपन्न झाला.