" ऊस लागणीसाठी प्रमाणीत बियाण्याचा वापर करा"- विलास जाधवकडेगाव :------ ऊस लागणीसाठी प्रमाणित बियाण्याचा वापर केल्यामुळे उत्पादनात 15 टक्के वाढ होते त्यामुळे कारखान्याच्या बियाणेमळ्यातील ऊस बियाण्याचा वापर करावा असे आवाहन क्रांतिअग्रणी डाॅ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी केले. कारखान्यामार्फत आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते.नूतन संचालक वैभव पवार अध्यक्षस्थानी होते. ते पुढे म्हणाले कि, " ऊस बियाण्याचा मुलभूत, पायाभूत व प्रमाणित अशा तीन श्रेणी आहेत.. संशोधन केंद्र पाडेगांव येथून कारखाना दरवर्षी मुलभूत बियाणे खरेदी करून शेतक-यांना उपलब्ध करून देतो. आडसाली लागणी पेक्षा पुर्व हंगामी ऊस लागण अधिक परवडते पुर्वलागणीसाठी कारखान्यामार्फत 50 टक्के अनुदानावर ऊस बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे.. ऊसाची लागणटिपरी पध्दतीने करण्यापेक्षा गादीवाफ्यावर रोपे तयार केलेस बियाणे खर्चात बचत होते, रोप लागणीचे फायदे मिळतात.याशिवाय या तंत्रज्ञानाचा अवलंब करणा-या शेतक-यांना 10 लिटर जिवाणू खतेमोफत दिली जाणार आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले कि कारखान्याच्या सर्व ऊस विकास योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यांनी घेऊन आपले ऊस उत्पादन वाढवावे... यावेळी उत्तम माने अशोक महाडिक प्रल्हाद पाटील शशिकांत चौगुले दिलीपराव माने विलास माने अर्जुन पाटील सुरज पाटील राहुल जाधव साहेबराव माने रोहित माने बबलू कोकाटे वैभव माने यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक वैभव माने सर यांनी तर आभार वैभव पवार यांनी मानले.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा