इलेक्ट्रिक मोटार चोरी करणारे चोरटे गजाआड.दोन लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त. कडेगांव पोलिसांची मोठी कारवाई. कडेगाव परीसरातून विद्युत मोटारी व केबलची चोरी सतत होत होती अखेर विद्युत मोटारी चोरणारे दोन आरोपींना कडेगाव पोलिसांनी गजाआड करून त्यांच्या ताब्यातून दोन लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. अनिल बाळू चव्हाण (वय 21) काशिनाथ राजू चव्हाण (वय 22) रा.कडेगाव लक्ष्मी मंदिराजवळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की दि7व8 जुलै रोजी कडेपुर येथील जयदिप संपतराव देशमुख(54)यांच्या मालकीचे श्री समर्थ शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित कडेपुर ता. कडेगाव या कारखान्याच्या गोडाऊनच्या शटरचे कुलुप तोडून कारखान्यातील इलेक्ट्रिक मोटार व केबल वायर चोरून नेली याबाबत कडेगाव पोलिस ठाण्यात 12जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचा कडेगाव पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केला. या चोरीचा तपास करत असताना दिनांक 16 /7/23 रोजी कडेगाव एसटी स्टँड समोर नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी हे वाहनांची तपासणी करत असताना टीव्हीएस कंपनीची एक्स एल 100 गाडी नंबर एम एच 10डीआर 1850 या गाडीवरून संशयितरित्या एक इलेक्ट्रिक मोटार घेऊन जात असताना त्या संशयीताला थांबून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून अधिक तपास केला असता त्याच्या ताब्यातील इलेक्ट्रिक मोटार बाबत पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील विद्युत मोटार असल्याची खात्री झाल्याने विद्युत मोटार व मोटरसायकल एम एच 10 डी आर 18 50 ही जप्त केली. सदर आरोपींची पोलीस कस्टडीत रिमांड मंजूर करून त्यांच्याकडून पोलीस कस्टडीमध्ये सखोल तपास केला असता गुन्ह्यातील एकूण दोन लाख पाच हजार रुपये किमतीच्या चार विद्युत मोटर व मोटार पंप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपीकडून आणखी विद्युत मोटारी व केबल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागिय पोलीस अधिकारी पद्मा कदम ,कडेगाव पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी, सहाय्यक पोलीस फौजदार अधिकराव वनवे पोलिस हेड कॉस्टेबल सतीश मुळे, शिवाजी माळी, अजित जाधव, प्रवीण पाटील, पोलिस नाईक पुंडलिक कुंभार, पोलिस शिपाई सागर निकम, संदीप जाधव ,संकेत सावंत ,उमेश तुपे यांनी केली आहे,

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा