जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलीत श्री शिवप्रभु विद्यालयाने शिष्यवृत्ती परिक्षेत टिकवली गुणवत्तेची परंपराजय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभु प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अनेक उपक्रमांच्या, कलेच्या तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचे व जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे नाव विविध स्तरावर उंचावण्याचे काम करतात. त्याचाच एक भाग महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक स्कॉलरशिप परीक्षेत श्री शिवप्रभु प्राथमिक शाळेतील वविद्यार्थ्यांनी सांगली जिल्ह्यात घव-घवीत यश संपादन करून जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या शिरपेचात अजून एक तूरा लावण्याचे कार्य केले.दर्जेदार शिक्षण देऊन शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात सन्मानाचे स्थान असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात कायम अग्रेसर असणाऱ्या कडेगाव तालुक्यातील आदर्श कडेगावची गुणवत्तेबरोबर सर्व गुणसंपन्न पिढी घडविणारी नामांकित असणारी जय महाराष्ट्र शिक्षण संस्था शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तेचा राज्य व जिल्हा पातळीवर ठसा उमटविणारी संस्था आहे. श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालयाने याही वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तेची परंपरा टिकविली आहे. असे मत जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे यांनी विद्यार्थ्यांचे सत्कार करताना व्यक्त केले . *श्री* *शिवप्रभू प्राथमिक विद्यालयाचा* इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२३मध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत शहरी विभागातून चौघे विद्यार्थीयशाचे मानकरी ठरले : 🥇१ ) आदिती चंद्रहस्त पवारतालुक्यात 3 री जिल्ह्यात 22 वी 🥈२ ) आरजू दस्तगीर मुलाणी तालुक्यात 5 वी जिल्ह्यात 34 वी 🥉३ ) अक्षरा धनंजय नरुले तालुक्यात 13 वी जिल्ह्यात 150 वी🏅४ ) शर्वरी विकास केंदळे तालुक्यात 15 वी जिल्ह्यात 177 वीगुणवत्तेत आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका पुनम चंद्रकांत शिंदे ,मुख्याध्यापिका मनिषा पवार व सर्व शिक्षक वर्ग यांचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे म्हणाले आजच्या स्पर्धेच्या जगात गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवप्रभू विद्यालयात सुसंस्कार, स्वाभिमान, त्याग, राष्ट्रभक्ती व चारित्र्य संपन्नता या पाच मौलिक विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भावी पिढी घडविण्याचे कार्य करीत आहे. गेल्या पंचवीस वर्षाची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा