कडेगांव शहरातून २9 जणांचे अमरनाथ यात्रेसाठी प्रस्थानकडेगांव येथिल एकुण २९ जणांनी अमरनाथ यात्रेसाठी प्रस्थान केले. अमरनाथ गुहा १२७०० फुट उंचीवर असून तेथे जाण्यासाठी १४ ते १५ हजार फुट उंची पार करावी लागते.कडेगांव शहरातून अमरनाथ यात्रेला २९ जण जाण्याची बहुतेक हतिहासात पहीलीच घटना असेल.विशेष म्हणजे या टिममध्ये पाच महीलांचाही समावेश आहे. अमरनाथ यात्रा ही हिंदू धर्मातील सर्व तीर्थक्षेत्रांपैकी एक सर्वात कठीण तीर्थक्षेत्र मानले जाते.दहा दिवसाच्या अमरनाथ यात्रेसाठी प्रवासास निघालेल्या सर्व यात्रेकरूसाठी कडेगावातील नागरिकांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.यात प्रामुख्याने कडेगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उदय देशमुख, नगरसेवक अमोल डांगे, श्रीराम देवस्थानचे अध्यक्ष प्रा. दिपक कुलकर्णी,सुरेशचंद्र थोरात जेष्ठ नागरिक जगन्नाथ नायकवडी, पत्रकार हिराजी देशमुख, हेमंत व्यास, दिपक शेडगे राकेश जरग, दत्तात्रय पाठक राजेंद्र राऊत, दिनकर जाधव,उपस्थीत राहुन शुभेच्छा दिल्या. तर यात्रेसाठी प्रस्थान केलेले मुकुंद कुलकर्णी, वसंत इनामदार, संजय गायकवाड, तानाजी भोसले, नामदेव देशपांडे, मायानंद देशमुखे, श्रीपाद दिक्षित, बाळासाहेब धर्मे, उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, अनिल देसाई, मोहन जाधव, भिमराव जाधव, संदिप चव्हाण, राजू देशमाने अभिजित गायकवाड, रघुनाथ गायकवाड, संतोष कुलकर्णी यांच्या सह कविता तडसरे, सारिका देशमुखे,अरूणा देशमुखे, रूपाली सगरे,अनिता देशमुखे महीलांनी अमरनाथ यात्रेसाठी प्रस्थान केले.या सर्व यात्रेकरूना कडेगांव शहरातील विविध संस्था, संघटना, मंडळांनी , नागरिकांनी, व महीलांनी शुभेच्छा दिल्या.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा