जय महाराष्ट्र संस्था संचलित श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयाच्या वतीने दिंडीचे दिमाखदार आयोजन.
जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयाच्या वतीने पालखी व दिंडीचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. यावेळी पालखीचे पुजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे यांच्या पत्नी सौ. नंदादेवी डांगे व माजी विद्यार्थी अभिषेक व्यास यांच्या पत्नी सौ. प्रतिक्षा व्यास, तहसीलदार अजित शेलार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे, कडेगांव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी,वसंत इनामदार प्रा. दिपक कुलकर्णी,सौ.स्वप्नाली डांगे,राजश्री डांगे उपस्थित होते.
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात कडेगांव शहर आणि परिसरातील शाळेत दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे कडेगाव मधील नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.
. टाळ मृदुंग व विठू नामांनी पालखी मार्ग निनादला.विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अतिशय देखणे असे नियोजन केले.
शिवप्रभु प्राथमिक विद्यालय कडेगांव येथे वारकरी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. तुळशी, पताका व टाळ घेऊन विठ्ठल भक्तीत रममाण झालेले विद्यार्थ्यांनी व बग्गी मध्ये विराजमान झालेली विठ्ठल रुक्मिणी,संत तुकाराम,वेषभुषेतील विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधले.कडेगावमधील समस्त नागरिकांनी व महीलांनी बाल वारकरी दिंडीचे स्वागत केले. आषाढी एकदशीचे औचित्य साधून स्वच्छताविषयक प्रबोधन फलक, प्लास्टिक हटावचा नारा देत गावातील प्रमुख मार्गावरू दिंडी निघाली.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे, वसंत इनामदार, शिवप्रभु प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ,मनिषा पवार ,अर्चना पवार,संगिता वेदपाठक,सुनिता शिंदे,आबा पवार,अजित खाडे,निलीमा कंदले,शिवराज लाटणे,सुहास लाटणे,अभिजीत जाधव,पूनम शिंदे इत्यादी शिक्षक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.