यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार उत्तर प्रदेशचे कॉम्रेड अतुल कुमार अनजान यांना जाहीर.
विटा ः क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठ विटा या संस्थेच्या वतिने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा सामाजिक पुरस्कार
" क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार " या वर्षी उत्तर प्रदेश मधील लढाऊ नेते कॉम्रेड अतुल कुमार अनजान याना देण्यात येणार आहे. कॉम्रेड अतुल कुमार अनजान लखनौ विद्यापिठातून कायद्याची पदवी घेतलेली आहे. विद्यार्थी दशेपासून आॕल इंडिया स्टुडंट फेडरेशन यालढाऊ विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून सार्वजनिक जिवनामध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर त्यांनी संघर्ष केला आहे. कायद्याची पदवी घेतलेनंतर त्यानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासदत्व स्विकारुन राजकीय जिवनात कामाला सुरवात केली आहे. भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा सखोल अभ्यास त्यांनी केला असून शेतकऱ्यांना न्याय मिळऊन देण्यासाठी त्यानी सतत रस्त्यावर उतरुन संघर्ष केला आहे. सामान्य माणसाना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशिल असतात. शेतकरी कामगार दलीत पददलीत यांचे साठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले आहे. आखिल भारतीय किसान सभेचे ते सरचिटणीस असून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पाॕलीट ब्युरोचे सदस्य आहेत .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठाने त्यांना आपला प्रतिष्ठेचा " क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार २०२३ " देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड भालचंद्र कांनगो यांचे हस्ते दि. ६ आॕगष्ट २०२३ रोजी दु १.३० वाजता विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहामध्ये त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. या अगोदर हा पुरस्कार आचार्य शांताराम ( बापू ) गारुड , क्रांतिवीर डॉ.नागनाथ नायकवडी , प्रा. डाॕ भाई एन. डी. पाटील , माजी आम. भाई गणपतरावजी देशमुख , कॉम्रेड कृष्णाजी मेणसे , साथी मृणालताई गोरे , मेघाताई पाटकर , प्रा. डाॕ . आ. ह. साळुंखे , न्यायमुर्ती कोळसे पाटील , न्यायमुर्ती बी. एन. देशमुख , विकास आमटे , डॉ. अभय बंग , कॉम्रेड आजित अंभ्यंकर , पत्रकार पी. साईनाथ , कॉम्रेड सिताराम येंच्युरी , कॉम्रेड अशोक ढवळे , पद्मश्री डॉ. गणेश देवी , कॉम्रेड भालचंद्र कांनगो , कॉम्रेड वृंदाताई करात आदि मान्यवराना देणेत आला आहे. पुरस्काराचे स्वरुप मानपत्र , मानचिन्ह , महावस्त्र , श्रीफल , क्रांतिसिंहाचेवरील ग्रंथ आणि रोख रु. २१०००/- असे आहे.
अॕड . सुभाष पाटील संघटक भाई सुभाष पवार अध्यक्ष क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठ विटा.