कडेगावचा चेहरा मोहरा बदलणार : संग्रामसिंह देशमुख.२ कोटीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते संपन्न. कडेगाव नगरपंचायतीवर सत्ता आल्यानंतर सुरवातीला आपल्या विचाराचे सरकार नसल्यामुळे निधी मिळण्यासाठी अनेक अडचणी आल्या. पण आता भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे निधी मिळण्यासाठी कोणतेही अडचण येणार नाही. गट,तट न पाहता कडेगावच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणून कडेगाव शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले ते कडेगाव नगरपंचायतीच्या विविध प्रभागातील २ कोटीच्या विकास कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते. यावेळी कडेगाव चे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, बांधकाम सभापती अमोल डांगे, आरोग्य सभापती निलेश लंगडे, महिला व बालकल्याण सभापती रंजना लोखंडे, मुख्याधिकारी डॉ.पवन म्हेत्रे प्रमुख उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख म्हणाले की केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे आता माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव शहरासाठी जास्तीत जास्त विकास निधी खेचून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. यावेळी प्रभाग ३ नामदेव पतंगे घर ते शंकर शेणे यांचा घरापर्यंत बंदिस्त गटार करणे, प्रभाग ४ मध्ये नईम पटेल ते जावेद पटेल ते रहिम ते नजीर पटेल यांच्या घरापर्यत काॕक्रीट रस्ता व बंदिस्त गटार करणे, प्रभाग८ मध्ये इनामदार वाडा येथे काँक्रीट रस्ता करणे, प्रभाग ९ गजानन रेस्टॉरंट ते सगरे वकील यांचे घरापर्यंत पिण्याचे पाण्याची पाईपलाईन करणे,प्रभाग ९ सूर्यवंशी घर ते शंकर जाधव घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करणे व सगरे वकील ते नंदकुमार पवार घरापर्यंत अंडरग्राऊंड गटार करणे, प्रभाग १४ मध्ये सुमन आनंदराव मिरजकर यांचे घर ते सुखदेव मोरे घर अंडरग्राउंड गटार व रस्ता काँक्रीटीकरण करणे, प्रभाग १४ मध्ये तडसर रोड पासून थोरात इलेक्ट्रिकल्स ते पवार सर यांचा घरापर्यंत अंडरग्राउंड गटार व रस्ता काँक्रीटीकरण करणे, प्रभाग १४ मध्ये भीमराव मोहिते घर ते भीमराव डांगे शॉप पर्यंत अंडरग्राउंड गटार व रस्ता काँक्रीटीकरण करणे, प्रभाग १६ भीमराव देसाई घर ते आनंद कोरे घरापर्यंत गटार करणे,प्रभाग ११ आदिलशहा मुल्ला घर ते रोहित देशमुख घर व बंदिस्त गटार व कॉंक्रिटीकरण करणे, प्रभाग ७ मोहनराव देशमुख घर ते आनंदा दोडे घरापर्यत रस्ता काँक्रीटीकरण व गटार करणे, प्रभाग ६ मध्ये साखळी आड ते नागपूर वसाहत पर्यंत पिण्याचा पाण्याची पाईपलाईन करणे या २ कोटीच्या विकास कामाच्या भूमिपूजना बरोबरच नगरपंचायतीच्या कचरा गाडी व ट्रॅक्टरचा लोकार्पण संग्रामसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका. नाजनीन पटेल, शुभदा देशमुख, नजमाबी पठाण, विद्या खाडे, मनीषा रजपूत, नगरसेवक बबन रास्कर, विजय खाडे, अभिजित लोखंडे , युवराज रजपुत, अशपाक पठाण, संजय गायकवाड, सुनील भस्मे, संतोष डांगे, सुनील गाढवे, दादा गायकवाड, दिलीप लोखंडे, बाबा कराडकर, अ‍ॅड.संजय सगरे, उदय देशमुख, यांच्यासह किशोर मिसाळ, पत्रकार हिराजी देशमुख, सूरज कडेगावकर, तेजस रास्कर, नुरअली पटेल, हाजी.सलामत पटेल, जाकीर मुल्ला, दिलावर इनामदार, गाणी तांबोळी, सलीम इनामदार, इस्माईल इनामदार, राहुल जाधव, सुहास कराडकर, ऋषिकेश पवार, अली पटेल, अमोल देशमुख, सोनू अधाटे पाटील, रविंद्र देशपांडे, प्रकाश शिंदे, अमोल जाधव, मानसिंग देशमुख, सुरेश देशमुख, गणेश भोसले, दत्ता शिंदे, इंद्रजित पवार, दत्ता माळी, शिवाजी चन्ने, राजेंद्र दीक्षित, आदीलशहा मुल्ला, कडेगाव शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा