डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या महिला शेतकरी प्रशिक्षणास रवाना डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत कारखाना कार्यक्षेत्रातील महिला ऊस उत्पादक शेतकरी व्ही.एस.आय.पुणे येथे जुलै अखेर होणाऱ्या ऊस शेती ज्ञानलक्ष्मी या ४ दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी रवाना झाल्या .कारखाना कार्यस्थळावर गाड्यांचे पूजन कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.एफ.कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक एस.एफ.कदम म्हणाले कि कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत कारखाना कार्यक्षेत्रातील प्रगतशील महिला शेतकऱ्यांना वर्षातून दोनवेळा व्ही.एस.आय.पुणे येथे ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षणासाठी कारखान्यामार्फत कारखान्याच्या संपूर्ण खर्चाने पाठविले जाते.आजच्या काळात महिला ऊस शेती व इतर शेतीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.सुशिक्षित महिला वर्गदेखील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत आहेत.या प्रशिक्षण कालावधीमध्ये माती-पाणी परीक्षण महत्व,खत व पाणी व्यवस्थापन,उती संवर्धित रोपे,बियाणे मळा,रोग व कीड व्यवस्थापन,जैविक खतांचा वापर,स्वयंचलित ठिबक सिंचन आदी विषयांवर प्रात्याक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.सदर प्रशिक्षण वर्ग एकूण चार दिवस चालणार असून सदर महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षणानंतर स्वतःच्या व आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये याचा चांगला फायदा होणार आहे. यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रशांत कणसे,प्र.ऊस विकास अधिकारी .हेमंत सूर्यवंशी,असि.शेती अधिकारी .वैभव जाधव,केनयार्ड सुपर वायझर शिवाजी सूर्यवंशी व प्रगतशील महिला शेतकरी यांचेसह शेती विभागातील कर्मचारी व ऊस उत्पादक सभासद शेतकरी उपस्थित होते.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा