कडेगावातील अपघातग्रस्त वारकऱ्यांना शासकीय मदत वारकऱ्यांच्या उपोषणाला यश






कडेगाव,  : गेल्या वर्षी पंढरपूर आषाढी वारीमध्ये अपघात होवून मयत झालेल्यांच्या वारसांना व जखमी झालेल्यांना  
शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झालेल्या 6.50 लाखांच्या मदतीचे धनादेश तहसीलदार अजित शेलार यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
पंढरपूर आषाढी वारीमध्ये अपघात होवून मयत झालेल्यांच्या वारसांना व जखमी झालेल्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, यासाठी मे 2023 मध्ये आखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.विकास भगवान पवार यांनी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी.एस.देशमुख व अभिमन्यू वरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली  व सहकार्याने 
कडेगाव तहसिल कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्याची राज्य शासनाने दखल घेतली असून मयत वारकरी भिमराव कोंडीबा जगताप (रा.वडियेरायबाग,ता. कडेगाव) यांच्या वारसांना 5 लाख रुपये तर जखमी वारकरी  यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये  आर्थिक मदतीचे धनादेश तहसीलदार अजित शेलार यांचे हस्ते वारसांना व संबंधितांना प्रदान करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार भिसे साहेब, सामाजिक कार्यकर्ते देशमुख बापू अभिमन्यू वरूडे, मनोज मिसाळ व वारकरी संप्रदाय व  कार्यकर्ते उपस्थित होते.
...........................

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा