दुबार फेरफार प्रकरणी चौकशी करून कारवाई कराराष्ट्रवादीच्या डी एस देशमुख यांची कडेगाव प्रांतधिकाऱ्यांकडे मागणी




कडेगाव तालुक्यात मोहिते वडगाव चे तलाठी यांनी बेकायदेशीर पणे दुबार नोंदी धरून शासकीय नियमांची पायमल्ली केली आहे.याबाबत आपल्या मार्फत योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष डी एस देशमुख यांनी लेखी निवेदणाद्वारे कडेगावचे प्रांताधिकारी डॉ विजयकुमार देशमुख यांचेकडे केली आहे.

           निवेदनात म्हणलं आहे कि, मोहिते वडगावचे तलाठी यांनी  2006 साली रद्द केलेल्या फेरफार मधील नोंद 2023 मध्ये दुबार धरली आहे. ही नोंद जाणीवपूर्वक आणि आर्थिक अमिषापोटी धरल्याचे दिसत आहे. रद्द झालेल्या किंवा केलेल्या फेरफारबाबत आपलेकडे रीतसर अपील करून दाद मागणे क्रम प्राप्त असताना तलाठी यांनी बेकायदेशीर पणे हे कृत्य केले आहे. अशा बेकायदेशीर वृत्तीना वेळीच आळा घालने गरजेचे आहे. संबंधित तलाठी यांचे संपूर्ण दप्तराची तपासणी करणे गरजेचे आहे तसेच त्यांचेवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कोणताही तलाठी अशाप्रकारे बेकायदेशीर पणे कोणतंही कृत्य करणार नाही.आपण निवेदनाबाबत तातडीने कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्याच्या पर्यायाचा अवलंब करावा लागेल.

            यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जगदीश महाडीक, कडेगाव शहर अध्यक्ष प्रवीण करडे अभिमन्यु वरूडे उपस्थित होते.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा