हणमंतवडिये येथील क्रांतिसिंह विश्वस्त मंडळाचे मोफत वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

हणमंतवडिये येथील क्रांतिसिंह विश्वस्त मंडळाचे मोफत वाचनालय या वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक स्मृती कार्यक्रम साजरा करुन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. 
हणमंतवडिये येथील क्रांतिसिंह विश्वस्त मंडळाचे मोफत वाचनालय गेली चाळीस वर्षे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. आज दिनांक 6 जून 20250छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे 351 वर्ष यानिमित्ताने वाचनालयाचे वाचन कक्षामध्ये वाचनालयाचे अध्यक्ष, ॲड सुभाष पाटील, सेक्रेटरी सागर पाटील, ग्रंथपाल सौ. प्रियांका पाटील, संचालक, गावचे सरपंच, किशोर जाधव, उपसरपंच सतिश मोरे, ग्राम अधिकारी, नवघरे तसेच ग्रामस्थ सकाळी 9 वाजता एकत्रित जमले. सुरवातीला ग्रंथपाल सौ प्रियांका पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळयाचे पुजन केले. यानंतर सरपंच व उपसरपंच यांनी अर्धपुतळयास पुष्पहार अर्पण केला. यानंतर उपस्थितांनी छत्रपतींच्या अर्धपुतळयास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड सुभाष पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व त्यांच्या राज्यकारभार वर लोकांना माहिती दिली. आजच्या गढूळ वातावरणात सर्वधर्मसमभाव माणसाच्या छत्रपतींचा आदर्श समाजासमोर असला पाहिजे असे प्रतिपादन केले. 
या प्रसंगी गावातील श्री विलास जाधव यांनी अतिशय दर्जेदार असिम 85 पुस्तके रुपये 15000/- पंधरा हजार किमतीची वाचनालयात भेट दिली. त्या ग्रंथाचा स्विकार सरपंच किशोर जाधव यांच्या हस्ते वाचनालयाचे अध्यक्ष व ग्रंथपाल यांनी स्विकार केला.श्री विलास जाधव यांच्या दात्रुत्वाबद्दल त्याचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले. शेवटी सेक्रेटरी सागर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले नंतर कार्यक्रमांची सांगता झाली.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा