सरस्वती स्कुल कडेपुर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
सांगली/कडेपुर
योग ही जीवन जीवनशैली " मानून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सरस्वती स्कूलमध्ये योग सादरीकरणाने "ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये मानाचे स्थान प्राप्त केले. विविध योगासने, प्राणायम व ध्यान यांचे सादरीकरण करत एक प्रेरणादायी उपक्रम प्रस्थापित केला. योगाच्या जागतिक प्रसारासाठी त्यांनी घेतलेले हे एक पाऊल शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्याचा संदेश देणारे ठरले. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी सहभाग घेऊन हा उपक्रम प्रेरणादायी केला. या त्यांच्या अनोख्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी योगप्रसारासाठी नव्या पिढीपुढे एक आदर्श निर्माण केला . या अनोख्या उपक्रमात मा. आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख श्री. प्रशांत राऊत साहेब बिडीओ व विस्तार अधिकारी लोहार साहेब यांनीही योगाचे प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन एक आदर्श ठेवला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले . शाळेच्या संस्थापिका सौ. वृषाली देशमुख वहिनी, व सरस्वती ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी मॅडम, व्यवस्थापक अमोल यादव यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे ,शिक्षकांचे व पालकांचे कौतुक केले.