छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास मोठा प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार
कडेगाव तालुक्यातील शाळगाव मंडळातील गावांच्या ग्रामस्थांचा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली/कडेगाव
दिनांक 20 जून 2025 रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात शाळगाव मंडलातील गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले. हे शिबिर जिल्हाधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले व मा. तहसीलदार कडेगांव यांच्या विशेष प्रयत्नांनी तालुक्यातील दुसरे समाधान शिबिर आयोजित केले होते.
या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी,प्रशांत राऊत तसेच नायब तहसीलदार श्रीमती वैष्णवी पुजारी तसेच पुरवठा निरीक्षक सुनील झाल्टे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. तसेच तहसील कार्यालयातील संजय गांधी विभाग l, पुरवठा विभाग, सेतू कार्यालय व महसूल विभाग उपस्थित होता. तसेच शाळगाव मंडळातील सर्व गावांचे ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी शाळगाव यांच्या सहभागाने मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी शाळगाव येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी 11 वाजता शिबिरास सुरुवात झाली.
. त्यांच्या पुढाकारामुळे अनेक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. यामध्ये वृद्धापकाळ, विधवा, अपंग योजना, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, आधार लिंक आदी विविध सेवांचा समावेश होता.
गावातील नागरिकांनी शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी महसूल विभागाच्या श्रीमती पुजारी मॅडम तसेच गटविकास अधिकारी राऊत साहेबयांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून योजनांची माहिती दिली.
शिबिरात एकूण 813 विविध प्रकारचे दाखले यामध्ये उत्पन्नाचे दाखले, कुणबी दाखले वाटप केले गेले. तसेच विविध योजनांचे एकूण 197 प्रस्ताव दाखले झाले अर्ज दाखल झाले.
शाळगाव मंडळातील ग्रामस्थानी शिबिरास उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून भरघोस प्रतिसाद दिला.
गावातील मान्यवरांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व विभागांचे व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.
फोटो ओळ कडेगांव तालुक्यातील शाळगाव मंडल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न झाले यावेळी तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.