अंमली पदार्थ विरोधी दिनाची महात्मा गांधी विद्यालयाने कडेगांव शहरातून काढली जनजागृती फेरी.
*अंमली पदार्थ विरोधी दिन आणि जनजागृती फेरी महात्मा गांधी विद्यालय कडेगाव येथे उत्साहात साजरी*
सांगली/कडेगांव
महात्मा गांधी विद्यालय कडेगाव येथे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीत विद्यार्थ्यांनी "व्यसन म्हणजे गुलामगिरी", "धूम्रपान व मद्यपान आरोग्याच्या धोक्याचे कारण", अशा सामाजिक संदेश देणाऱ्या घोषणा आणि फलकांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती केली.
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण डी. व्ही. साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
यावेळी विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढत अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्व पटवून दिले. उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक श्री. माने एस. एस सर श्री. वैभव करांडे सर आणि अन्य शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.