कडेगांव येथील महात्मा गांधी विद्यालय व श्रीरंग नामदेव कदम ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
महात्मा गांधी विद्यालय (टेक) व श्री. ना. कदम ज्युनिअर कॉलेज, कडेगाव येथे योग दिन उत्साहात साजरा
सांगली/कडेगाव
महात्मा गांधी विद्यालय (टेक) व श्री. ना. कदम ज्युनिअर कॉलेज, कडेगाव येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास गावातील मान्यवर, शालेय समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला प्रांताधिकारी श्री. रणजित भोसले साहेब, तहसीलदार श्री. अजय शेलार साहेब, मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री. चिमटे साहेब, नोडल अधिकारी श्री. वाझे साहेब, नगराध्यक्ष श्री. धनंजय (भैय्या) देशमुख, उपनगराध्यक्ष श्री. अमोल डांगे, हे उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण डी. व्ही. साहेब, उपमुख्याध्यापक श्री. रोकडे पी. एस. सर, रयत बँकेचे चेअरमन श्री. शेख बी. एच. सर, तसेच योगगुरु श्री. राहुल काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगासने, प्राणायाम व सूक्ष्म व्यायामांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमात प प्रतिष्ठित नागरिक श्री. राजाराम गरुड, श्री. हाजी फिरोज बागवान, श्री. संभाजी देसाई, जनरल बॉडी सदस्य, स्कूल कमिटी सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पालक संघ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, NCC कॅडेट्स, तसेच जिल्हा परिषद शाळा कडेगाव व जिल्हा परिषद उर्दू शाळा येथील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत सुयोग्य रितीने करण्यात आले होते. योगदिनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी योगाचे आरोग्यदायी फायदे सांगून विद्यार्थ्यांना दररोज योगाचा सराव करण्याचे आवाहन केले.