प्रा.मन्सुर जमादार यांना काव्य महोत्सव पुणे येथे काव्यसंग्रहास राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार प्रदानकडेगाव चे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक कवी मन्सूर जमादार सर यांना ,"वैशाखी वादळ वारा काव्य महोत्सव पुणे" येथे येथे त्यांच्या ,"अनुभव तरंग "या काव्यसंग्रहास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते "राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला .सदर कार्यक्रम एस एम जोशी फाउंडेशन सभागृह पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी अनेक मान्यवर साहित्यिक, कादंबरीकार ,कथाकार ,गायक, राष्ट्रपती पुरस्कार विजेते साहित्यिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे ही सांस्कृतिक, व साहित्यिकांची नगरी असल्याचा प्रत्यय क्षणाक्षणाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी येत होता कवी जमादार सर यांच्या कविता" हृदयाला भिडणाऱ्या व समाजातील अनेक समस्यांना स्पर्श करणाऱ्या "असून त्या मनोरंजक व प्रबोधन पर सुद्धा आहेत असे अनेकांनी उल्लेख करून जमादार सर यांचे कौतुक केले व भावी दर्जेदार भावपूर्ण लेखनाबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या यापूर्वी कवी जमादार सर यांना पद्मश्री कवी सुधांशू दादा यांच्या ,"सदानंद साहित्य मंडळ औदुंबर" यांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे त्याच बरोबर अग्रणी साहित्य संमेलन देशील हरोली येथील "अग्रणी प्रेरणा पुरस्कार "बहाल करण्यात आला आहे तसे पट्टण कोडोली साहित्य संमेलन कोल्हापूर यांचा "साहित्य भूषण पुरस्कार व प्रतिष्ठा फाउंडेशन तासगाव यांचा "राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार" प्राप्त झाला आहे कवी जमादार सर यांनी आत्तापर्यंत अनेक राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा ,कथाकथन स्पर्धा, गायन स्पर्धा आणि भारती विद्यापीठ पुणे व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या कडेगाव युवा महोत्सवामध्ये परीक्षक म्हणून व समीक्षक म्हणून काम केले आहे कथा निर्मिती कार्यशाळेमध्ये ही त्यांनी प्रभावीपणे आपली भूमिका अनेक वेळा मांडलेली आहे अनेक साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना संधी प्राप्त झाली असून त्यांनी आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडलेली आहे कवी जमादार सर कथालेखक असून त्यांच्या अनेक कथा दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत त्याचबरोबर युट्युब चॅनेल "काव्यांजली "येथे त्यांच्या अनेक कविता प्रसारित झाल्या असून हजारोंनी त्यांच्या कवितांना प्रतिसाद दिला आहे अनेक गीत youtube वर प्रसारीत होत आहेत कवी जमादार सर यांचा शैक्षणिक ,सामाजिक , साहित्यिक, क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या कडून अभिनंदन होत असून भावी लेखनासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा