जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ.प्रथमेश व्यास व डॉ समृध्दी व्यास वइयत्ता पाचवीतील स्कॉलरशिप मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेली प्रांजल प्रमोद यादव यांचा संयुक्त सत्कार संपन्न

माजी विद्यार्थी डॉ प्रथमेश व्यास व इयत्ता पाचवी मधील तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवलेली प्रांजल यादव यांचा संयुक्त सत्कार समारंभ संपन्न 

कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथुन प्रथमेश हे एम बी बी एस झाले.त्यानंतर एम एस नेत्ररोग तज्ञ लातुर येथे केले .लातुर येथे एम एस मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या  डॉ.प्रथमेश व डॉ .समृध्दी व्यास या. दोन डाॅक्टरांचा सत्कार सोहळा'जयमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे यांनी श्री शिवप्रभु विद्यालयात आयोजित केला होता.  

माजी विद्यार्थी डॉक्टर प्रथमेश प्रदीप व्यास व इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मध्ये कडेगाव तालुक्यात पहिला क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी प्रांजल प्रमोद यादव यांचा संयुक्त सत्कार करण्यात आला.
 

डॉ.प्रथमेश हा श्री शिवप्रभु विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे वैद्यकीय क्षेत्रात एम एस पदवी परिक्षेत उज्वल यश संपादन केले असल्यामुळे या दोन्ही डॉक्टरांचा  सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे, डॉ प्रदिप व्यास,प्रमोद यादव,प्रा.दिपक कुलकर्णी, वसंतराव इनामदार, पत्रकार हेमंत व्यास,संतोष चव्हाण उपस्थित होते . हा सोहळा, विद्यार्थी विद्यार्थिनी यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा समाजाला अभिमान व्यक्त करण्यासाठी हा सत्कार आयोजित केला असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम डांगे यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेतून स्कॉलरशिप मध्येही सातत्याने विद्यार्थी गुणवत्ता यादीत जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर चमकत आहेत. याचे संपुर्ण श्रेय विद्यालयातील 
मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षिका यांना द्यावेच लागेल.विशेष म्हणजे या शाळेतून पुढील शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठे शासकीय पदाधीकारी, इंजिनिअर, डॉक्टर झालेत.हे सर्व माजी विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत हे विशेष म्हणावे लागेल.यावेळी संस्थेचे सदस्य प्रा.दिपक कुलकर्णी, वसंतराव इनामदार यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक व आभार प्रा प्रविण कदम यांनी मानले यावेळी विद्यार्थी,विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

महात्मा गांधी विद्यालय, कडेगाव येथे NCC ‘A’ प्रमाणपत्र वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला