सरस्वती स्कुल मध्ये विद्यार्थ्यांना दिली मानवंदना

*सरस्वती स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दिली नेतृत्वाची धुरा* 

सरस्वती स्कूल, कडेपुर येथे सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी शाळेचे हेड बॉय, हेड गर्ल आणि कौन्सिलिंग मेंबर्स यांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करून बॅच व सॅशे देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमात विशेष परेडचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामधून विद्यार्थ्यांचे नेतृत्वगुण अधोरेखित करण्यात आले.


कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कडेगाव पोलीस स्टेशनचे सब-इन्स्पेक्टर श्री. काळे सर,पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री मुल्ला सर,पोलीस कॉन्स्टेबल श्री जाधव सर व पूजा मॅडम तसेच पोलीस पाटील दुबिले मॅडम, उपस्थित होते सरस्वती ग्लोबल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सूर्यवंशी मॅडम व उपमुख्याध्यापिका सौ.चव्हाण मॅडम व व्यवस्थापक श्री.अमोल यादव सर यांनी पाहुण्यांचे औपचारिक स्वागत केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने सन्मानपूर्वक भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अनुष्का महादेव जाधव हिने कडेगाव तालुक्यात प्रथम व जिल्ह्याच्या यादीत मानाचे स्थान मिळवून स्कॉलरशिपची मानकरी ठरली. याबद्दल तिला भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.

शिस्तबद्ध परेड, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व पाहुण्यांचे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला. शाळेच्या व्यवस्थापनाने यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा