कडेगांव येथे महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांचे वतीने आषाढी दिंडींचे आयोजन
*महात्मा गांधी विद्यालय ( टेक ) व श्रीरंग नामदेव कदम ज्यु. कॉलेज कडेगाव येथे आषाढी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न*
कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालय (टेक) व श्रीरंग नामदेव कदम ज्यु. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक आषाढी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला.
या प्रसंगी (ज्ञानेश्वरी) पालखीचे पूजन करण्यासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व अपशिंगे गावचे लोकनियुक्त सरपंच मा. भारत सूर्यवंशी, मा. नगरसेवक नितीन शिंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण डी. व्ही. साहेब, उपमुख्याध्यापक श्री. रोकडे सर, पर्यवेक्षक श्री. भंडारे सर, रयत बँकेचे चेअरमन व ज्येष्ठ शिक्षक श्री. शेख बी. एच. सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात दिंडी सोहळा काढला. श्री विठ्ठल-माऊलीच्या प्रतिमेची मिरवणूक करत संपूर्ण परिसर भक्तिमय करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री. वैभव कदम सर, कलाशिक्षक श्री. सतीश माने सर, श्रीमती मेश्राम मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक करत अशी सांस्कृतिक परंपरा जपण्याचे आवाहन केले.