अनाथ आश्रमातील मुलांच्या समवेत अभिषेक व्यास ने केला वाढदिवस साजरा
सध्या सर्वत्र लहान मोठ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेळे उपक्रम आयोजित करून आवाढव्य खर्च करण्याचे चित्र आपण सर्वत्रच पहात असतो.इतर खर्चाला फाटा देत अभिषेक याने आपल्या सहकुटुंबासह अनाथ आश्रमात वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले.अभिषेकसह त्याची पत्नी प्रतिक्षा बहीण इश्वरी,काका विश्वास काकु वर्षा व्यास मनाली जोशी व आजी इत्यादी उपस्थित होते.
वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदाने अनाथ आश्रमात साजरा केला वाढदिवस साजरा करताना तेथील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून माझे मन खूप खुश झाले. मी त्यांना वही, पेन,केक चॉकलेट खूप सारे गिफ्ट्स दिले.त्याच बरोबर इडली सांबार,चटणी व केक, चॉकलेट देऊन अनाथ मुलांचा दिवस गोड केला.मुलांच्या चेहऱ्यावरील स्मित हे माझ्या जीवनातील वाढदिवसाचा सर्वात सुंदर क्षण होता.
ह्या अनुभवाने मला कळले की जीवनात खुशी शोधण्यासाठी फार काही पैसे लागत नाहीत. ती फक्त आपल्या आजूबाजूला अस्तित्वात असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरील स्मित आणि आनंदात असते.यावेळी अनाथ आश्रमातील शिक्षकांनी व मुलांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आभार मानले यावेळी विश्वास व्यास,सर्वेश कराडकर,किशोर जाधव,सौ.वर्षा व्यास,सौ प्रतिक्षा व्यास,मनाली जोशी उपस्थित होते.अशाच प्रकारे तरूणांनी पण आपला वाढदिवस इतर खर्च न करता अनाथ आश्रमातील मुलांना अन्नदान करून व गिफ्ट देऊन त्यांच्या सानिध्यात करावा असे आवाहन अभिषेक व्यास यांनी केले.