आंतरराष्ट्रीय कितीॅचे शिल्पकार चंद्रजीत मारूतीराव यादव यांचे दुःखद निधन

आंतरराष्ट्रीय कितीॅचे शिल्पकार चंद्रजीत यादव यांचे निधन 

सांगली/कडेगांव 

कडेगांव तालुक्यातील कोतवडे  येथील आंतरराष्ट्रीय कितीॅचे शिल्पकार चंद्रकांत मारुतीराव यादव यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे रविवारी दुःखद निधन झाले.
      मुंबई आर्ट गॅलरीचे सेक्रेटरी,आंतरराष्ट्रीय शिल्पकार 
चंद्रजित यादव यांचे मूळ गाव कडेगाव तालुक्यातील कोतवडे. एवढ्या छोट्याश्या गावातून मुंबईला जाऊन त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडवकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोतवडे गावी तर विद्यालयीन शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय कडेगांव येथे झाले होते.
 अतिशय मनमिळावू आणि साध्या स्वभावाचे असलेले यादव हे प्रसिद्धीपासून दूर रहात असतं.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता.
त्यांच्या निधनाने शिल्पकला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.भाजपाचे नेते सुरेश यादव व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ सुनंदा सुरेशचंद्र थोरात हे त्यांचे भाऊ व बहिण होते स्व.चंद्रजीत यांचे ते धाकटे बंधू होते.अंत्यविधी मुंबई येथे शोकाकुल वातावरणात पार पडला तर रक्षा विसर्जन  त्यांच्या मुळ गावी कोतवडे  येथे सकाळी 9 वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी कोतवडे येथे होणार आहे.


Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा