ग्रीन पॉवर शुगर्स लि.गोपुज कारखान्याचे रोलर पुजन संग्रामसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न...
" गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध : संग्राम देशमुख."
" ग्रीन पॉवर शुगर्स, लि.गोपूजचे रोलर पूजन संग्राम देशमुख " यांच्या हस्ते संपन्न.
सांगली/कडेगाव-
ग्रीन पॉवर शुगर्स लि.गोपूज या साखर कारखान्याच्या वर्ष २०२५-२६ गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन व प्रतिष्ठापन कार्यक्रम कारखान्याचे मुख्य प्रवर्तक सांगली जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष संग्रामसिंह (भाऊ)देशमुख.यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख म्हणाले गळीत वर्ष २०२५-२६ या गाळप हंगामातील मिलर रोलर पूजन प्रतिष्ठापना कार्यक्रम आज करण्यात येत आहे. फिटिंग, जोडणी व इतर सर्व कामे सुरू आहेत ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी, ऊस तोडणी मशीन इत्यादीचे वाहतूक करार सुरू असून. कारखाना कार्यक्षेत्रातील, व गेटकेन क्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी कारखान्याकडे आपला ऊस नोंद करून ऊस आपल्या कारखान्याकडे पाठवून योग्य सहकार्य करावे, गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध करण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज झाले आहे. आपले सर्वांचे सहकार्य व चांगले योगदान लाभल्यामुळे आज कारखाना प्रगतीपथावर असल्याचे संग्राम देशमुख यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख,जयदीप देशमुख,विश्वतेज देशमुख, जयराज देशमुख,चंद्रकांत मोरे, अमर यादव, सागर यादव, लालासाहेब यादव, मयूर कदम, प्रकाश नलवडे,जनरल मॅनेजर झुंजार असबे, जनरल मॅनेजर केन मनोहर मिसाळ, जनरल मॅनेजर फायनान्स.एच.व्ही.पाटील, प्रशासकीय अधिकारी.जगदीश यादव, ओएसडी विजय जगताप,चिफ इंजिनिअर महादेव गारळे, चीफ केमिस्ट विठ्ठल ठोंबरे, डिस्टलरी मॅनेजर अशोक कदम, सिव्हिल इंजिनिअर सुनील पवार, लेबर ऑफिसर विनोद यादव, तसेच कारखान्याचे इतर अधिकारी आणि कर्मचारी सभासद, शेतकरी उपस्थित होते.
फोटो ओळ.
ग्रीन पॉवर शुगर लि. गोपूज कारखान्याचे मील रोलर पूजन कार्यक्रमाप्रसंगी मुख्य प्रवर्तक संग्राम (भाऊ) देशमुख, अपर्णाताई देशमुख, जयदीप देशमुख विश्वतेज देशमुख, जयराज देशमुख जनरल मॅनेजर झुंजार असबे सोबत सभासद शेतकरी व कर्मचारी.