मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे/सर्किट बेंचचे उद्घाटन संपन्न
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील खंडपीठाचे/सर्किट बेंचचे उद्घाटन झाले.
सांगली/कडेगांव
कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात 17 ऑगस्ट हा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला गेला त्याबद्दल माझे दोन शब्द, शुभांगी डांगे (काळे ), वकील, मुंबई उच्च न्यायालय, मी सांगली जिल्ह्यातील कडेगाव गावमधील प्रगतशील शेतकरी राजाराम डांगे यांची मुलगी. माझे B. Sc. पर्यन्त चे शिक्षण हे ग्रामीण भागात झाले, त्यानंतर मला MCA करण्याची इच्छा होती पण माझे वडील राजाराम डांगे यांनी मला MCA ला न जाता तू LL. B. कर असे सांगितले व म्हणाले तू LL. B. करून आपल्या गोरगरीब समाजातील वंचित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तु एल एल बी (वकील)
हो हीच माझी इच्छा आहे. असे मला सांगितले, आणि तेव्हा पासून मी LL. B.ला शहाजी law कॉलेज कोल्हापूर ला Admission घेऊन जनतेसाठी न्याय मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरुवात झाली. LL. B., LL. M शिक्षण घेत असतानाच जनतेच्या अडअडचणीची माहिती घेत होते, शिक्षण पूर्ण झाल्या वर ग्रामीण भागात कडेगांव,कराड,विटा इत्यादी ठिकाणी प्रॅक्टिस ला सुरुवात केली.
आणि तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून माहिती घेऊन काम करण्यास सुरुवात केली, त्यानंतर माझे पती विजय काळे यांच्या बरोबर मुंबई येथे येऊन माझ्या या गरीब जनतेपर्यंत न्याय पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी आम्ही ग्रामीण भागातील लोकांचे हाल पाहत होतो.पण काय करणार त्यावेळी असं वाटायचे कधी बदलणार आपण तर खूप लहान आहे बदल करू शकणार नाही मनात नेहमी खंत या लोकांना कसा न्याय मिळणार पण आज 17 ऑगस्ट मा.न्या. भूषण रामकृष्ण गवई साहेब यांनी हा बदल घडवला खूप मोठ कार्य केले आहे, व गरीब, वंचित जनतेला न्याय दिला आहे त्याबद्दल अभिनंदन, आभार मानावे तितके कमीच गरीब जनतेचे स्वप्न पूर्ण झाले, आपले कोल्हापूर खंडपीठ झाल्यामुळे गरीब जनतेच्या घरापर्यंत न्याय मिळणार आहे. यांचे सर्व श्रेय माझ्या देवाला म्हणजेच मा. न्या. भूषण गवई साहेब यांना.
आपल्या कोल्हापूर मधील उदघाटन सोहळा पाहून डोळयांतील अश्रू अनावर झाले.
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने कोल्हापूर नगरीत मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाल्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांना महालक्ष्मीनेच जणू ताकत दिली आहे, आणि या लढ्यासाठी सहकार्य केलेल्या प्रत्येकाची मी ऋणी आहे व या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभले.अशा भावना अॅड. शुभांगी डांगे (काळे ) मुंबई उच्च न्यायालय यांनी कडेगांव चौफेरशी बोलताना व्यक्त केल्या.