आले पिकाचा दर वाढणे व पाडणे हे व्यापारी करतात
आले दर वाढविणे,पाडणे हा सगळा व्याराऱ्यांचा खेळ असतो.
जुने- नवे प्रतवारी करून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट : प्रतवारी न थांबवल्यास शेतकरी उभारणार संयुक्त लढा
सांगली/ कडेगाव :
सांगली आणि सातारा जिल्ह्यात आल्याच्या खरेदीवरून शेतकरी–व्यापारी संघर्ष तीव्र होण्याच्या मार्गावर आहे. आले पिकाची प्रतवारी न करता सरसकट खरेदी करा असा सरकारचा आदेश असूनही “आले प्रतवारी” म्हणजेच जुने–नवे असा भेद करून शेतकऱ्यांची सरळसरळ लूट केली जात आहे.यामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
राज्यात संभाजीनगर ,सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यासह काही भाग या तीन जिल्ह्यात आले उत्पादन मोठ्या प्रमाणात होत. आहे.संभाजी नगर मधील आले खोडवा पिक जेमतेम राहिले आहे.तर सातारा आणि सांगली जिल्ह्यात अद्याप खोडवा पिक 25 ते 30 टक्के शिल्लक आहे.त्यामुळे सध्या बाजारात आल्याची आवक कमी झाल्याने आले पिकाचे दरात वाढ झाली आहे. परंतु व्यापारी सरसकट आले खरेदी न करता जुने आणि नवे म्हणजे नवीन फुटवा आलेले अशा प्रकारे आल्याची प्रतवारी करीत आहे. जुन्या आले पिकला प्रतिकिलो 40 ते 45 तर नवीन आले पिकाला केवळ 18 ते 25 रुपये दर देत आहेत.यामुळे शेतकऱ्यांनी फसवणूक होत आहे.जून आणि नवीन प्रतवारी न करता सरसकट एकच दर द्यावा अशी शेतकऱ्याची मागणी आहे.शासनाने ही प्रतवारी करू नये अशा सूचना दिल्या असताना देखील व्यापारी खुलेआम शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पूर्वी आले धुण्यासाठी शेतकरी ओढे, नाले, नदी–तलावांचा वापर करत होते. पण आता बहुतेक व्यापाऱ्यांनी खाजगी जागेत स्वतःचे धुणी सेंटर उभी केली आहेत. त्यामुळे हा धंदा पूर्णपणे व्यापाऱ्यांच्या हातामध्ये गेला आहे . याचाच फायदा घेऊन व्यापारी शेतकऱ्यांची कोंडी करत आहेत, दर पाडत आहेत आणि लूट सुरू ठेवत आहेत.परंतु दुसरीकडे हीच परिस्थिती आंदोलनाला तातडीने पेट घेण्यास भाग पाडणारी आहे. पूर्वी रस्त्यावर लढताना काही मर्यादा होत्या; पण आता व्यापाऱ्यांच्या खाजगी वॉशिंग पॉईंट्सवर थेट संघर्ष उभा राहू शकतो. ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरली आहे.
चौकट :
सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती :
नव्या मालाची प्रतवारी टिकू लागली असून नव्या मालाची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे नव्या मालाचे दर 18 ते 25 रुपये एवढे आहेत, तर जुना माल मात्र 40 ते 45 रुपये एवढ्या दराने विकला जात आहे.
तुलनेने बाजारपेठेत नवा माल स्वस्त मिळत असल्यामुळे त्याची मागणी अधिक वाढत आहे. यामुळे काही दिवसांत जुन्या मालाची मागणी कमी होईल आणि नव्या मालाचे प्राबल्य वाढेल. परिणामी पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
म्हणूनच शेतकऱ्यांची भूमिका ठाम असून सरसकट सौदे आणि ही काळाची गरज आहे.
चौकट :
सरकारी आदेशाची पायमल्ली थांबवलीच पाहिजे.
आले प्रतवारी कायमची बंद झालीच पाहिजे.
व्यापाऱ्यांची लूट सहन केली जाणार नाही! स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या भूमिकेला ठाम पाठिंबा देत आघाडीवर राहणार आहे. सातारा–सांगली शेतकऱ्यांनो सज्ज व्हा! सरकारी आदेशाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी आता रस्त्यावर उतरून लढा द्यावाच लागेल.शेंडी तुटो वा पारंबी – आले प्रतवारी संपल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाहीत.
- अनिल पवार ,राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
चौकट करणे
जुने आणि नवे आले प्रतवारी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाचा आदेश असूनही व्यापारी आल्याची प्रतवारी करून शेतकऱ्यांना लुटत आहे . मोटार सायकल वरून फिरणारा अनपड व्यापारी फाॅच्युनत घेवून फिरत आहे.शेती खते व औषधै विक्रेते यांच्या चार चाकी बंगले झाले शेतकरी मात्र भिकेकंगाल झाला आहे.त्यामुळे प्रतवारी थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन उभारू .
- डी एस देशमुख ,प्रमुख पाणी संघर्ष समिती.
फोटो आले शेतीचा