कडेगांव शहराचा विकास हा पर्यावरण पूरक असवा.जिल्हाधिकारी अशोक काकडे

"शहराचा विकास पर्यावरण पूरक असावा : जिल्हाधिकारी अशोक काकडे."

" जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कडेगाव येथे वृक्षारोपण "

सांगली/कडेगांव : सुहास कराडकर 
      
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्रच्या धर्तीवर आमची सांगली हरित सांगलीचे ब्रीद हाती घेऊन आपल्याला जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्यासाठी सर्वांनी विशेषतः युवकांनी जागरूक होण्याची गरज आहे.शहराचा विकास हा काँक्रिटी पुरता मर्यादित न राहता कल्पक व पर्यावरण पूरक असावा इमारती स्थापत्य कलेच्या दृष्टीने आकर्षक असाव्यात आणि इमारतीच्या प्रांगणात पर्यावरण पूरक देशी झाडे लावण्याचे आव्हान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
       ते राज्य शासनाच्या 'हरित महाराष्ट्र समृद्ध-महाराष्ट्र'उपक्रमांतर्गत कडेगाव नगरपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, श्री.शिवप्रभू प्राथ.विद्यालय, छ.शिवाजी महाराज चौक येथील ऑक्सिजन पार्क, एम.आय.डी.सी. परिसर, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरात देशी प्रजातीच्या ५०० रोपांची लागवड करण्यात वृक्षारोपण करण्यात आले या वृक्ष लागवड कार्यक्रमा वेळी ते बोलत होते.
     यावेळी कडेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष पै.अमोल डांगे, मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, जिल्हा सह.आयुक्त दत्तात्रय लांघी, तहसीलदार अजित शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, वनसंरक्षक उपसंचालक सागर गवते, विभागीय अधिकारी प्रशांत वरुडे प्रमुख उपस्थित होते.

            यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना जिल्हाधिकारी यांनी तुम्ही उद्याची पिढी आहात स्वतःचा विकास करण्यासाठी वाचन मनन चिंतन या त्रिसूत्रीचा अवलंब करून स्वतःच्या तसेच नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून शहराच्या जडणघडणीत हातभार लावा असा सल्ला दिला. कडेगाव नगर पंचायत वृक्षलागवडी मध्ये अग्रेसर असल्याचे व 'एक पेड माँ के नाम' हा उपक्रम प्रत्येकाने राबवून पर्यावरणाचे रक्षण करून वृक्ष लागवड केलेल्या रोपांची नोंदणी करावी असे आवाहन नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांनी केले.
     यावेळी सभापती विजय गायकवाड, निलेश लंगडे, महात्मा गांधी विद्यालयचे मुख्याध्यापक डी.व्ही चव्हाण, रयत बॅंकचे चेअरमन बी एच शेख, त्याच बरोबर सर्व शिक्षिका व विध्यार्थी, कडेगाव नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, अधिकारी कर्मचारी, पत्रकार संतोष कणसे कृती समितीचे कडेगांव तालुकाध्यक्ष हीराजी देशमुख,रजाली पिरजादे उपस्थित होते.




   

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा