राष्ट्र प्रेम व राष्ट प्रथम ही शिकवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली संग्रामसिंह देशमुख
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्षानिमित्त समन्वयक बैठक कडेपूर येथे संपन्न"
सांगली/कडेपूर :
पक्ष, कार्यकर्ता,संघटना, कार्यकर्त्यांच्या प्रति असणारी प्रतिष्ठा, समाजकारण व राजकारणाचा पाया भक्कम करून सातत्य ठेवण्यात संघाचे खूप मोठे योगदान असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिस्तीला खूप महत्व आहे. सर्व जाती,धर्म बारा पगड जातीना खऱ्या अर्थाने राष्ट्र प्रेम व राष्ट्र प्रथम ही शिकवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिली असल्याचे सुतोवाच सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.
ते कडेपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित पलूस कडेगाव तालुक्याच्या समन्वय बैठकीत बोलत होते.
यावेळी रुपेश बाजीराव कुंभार,कडेगाव तालुक्याचे माजी संघचालक रघुनाथ जगन्नाथ पिसाळ,तालुका कार्यवाह प्रताप पांडुरंग पंडित प्रमुख म्हणून उपस्थित होते.
यावेळी रुपेश कुंभार यांनी मार्गदर्शन केले. पुढे बोलताना संग्राम देशमुख यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सर्व स्वयंसेवक व कार्यकर्ते यांनी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विजयादशमी संचलनात सहभागी होण्याचे आव्हान केले.