वन्यजीव रक्षक टिमकडून सर्प नियंत्रीत ठेवण्यासाठी जनजागृती अभियान मोहीम राबविणार.सर्प मित्र दिपक कोळी
सांगली/कडेगांव:
काल 25/09/2025 रोजी गुरुवार कोतीज येथे दुर्गामाता निमित्त वन्यजीव रक्षक तालुका कडेगाव टीम कडून सर्पमित्र राकेश कवर, मनोज यादव ,विवेक मोहिते ,तोशीफ मुल्लानी ,आतिश कांबळे , गायत्री गुरव, आर्या मोहिते ,अस्मिता यादव ,दिपक कोळी , जहांगीर पटेल यांच्यामार्फत जनजागरण कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये सापाच्या विविध जाती , साप कसा ओळखावे साप आपल्या घरापाशी का येतो , साप येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे , साप चावल्यानंतर चा प्रथम उपचार काय केला पाहिजे ह्या गोष्टी सांगण्यात आले तसेच पुढील अनेक कार्यक्रम करण्यासाठी इतर गावांनाही आव्हान करण्यात आले यावेळी त्यांनी कार्यक्रमासाठी सर्पमित्र दिपक कोळी मो.8080840628 यांच्याशी संपर्क साधावा . निसर्गातील व सर्व निसर्गाचा अन्नजीव साखळीतील एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्यांची ही संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी ही जनजागृती करण्यात येत आहे
उचला पाऊल निसर्ग वाचवण्यासाठी