कोतवडे येथील छ.शिवाजी महाराज नवरात्र मंडळाने वृक्षारोपणाचा उपक्रम राबवुन एक वेगळा ठसा उमटविला.

कडेगांव तालुक्यातील कोतवडे येथे छ.शिवाजी महाराज नवरात्र उत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम 

सांगली/कडेगांव 
अश्विन हा पावसाळ्यातील शेवटचा महिना. हस्ताच्या सरी कोसळतात, परंतु त्यातील तीव्रता कमी झालेली असते. आजूबाजूची हिरवीगार सृष्टी पाहून मन प्रसन्न होते. निसर्गाच्या सौंदर्याची उधळण पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. अशा वेळी शरद ऋतूचे आगमन होते. धरणीमाते बरोबर सर्वजण सुखावलेले असतात. अशा या प्रसन्न महिन्यात अनेक उत्सवांबरोबर नवरात्र उत्सव येतो.असाच उत्सव कोतवडे येथील  गावातील छत्रपती शिवाजी महाराज नवरात्र उत्सव मंडळाने  एक अनोखा उपक्रम राबवलेला आहे. 
सगळीकडे नवरात्री मध्ये वेगवेगळे कार्यक्रम चालू असताना. या मंडळाच्या युवकांनी, ग्रामस्थांनी व गावातील महीलांनी एकत्र येऊन.नवरात्रीत पाचवी माळ (पाचव्या दिवशी)
      
वृक्षारोपणाचा उपक्रम ठेऊन दिनांक २६ /०९/२०२५ रोजी नवरात्रीचा हिरवा रंग असताना मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यामुळे कडेगांव तालुक्यात या अशा अनोख्या उपक्रमाची जोरदार चर्चा होत आहे व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक होत आहे.यावेळी उपस्थित मंडळातील सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा