जिवजी महाले यांचे स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी व्हावे.-- सयाजीराव झुंजार

* जिवाजी महाले यांचे स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी व्हावे - सयाजीराव झुंजार*
 
सांगली/कडेगांव :
 इतिहासामध्ये डोकावून पाहताना प्रतापगडच्या पायथ्याशी झालेली छ.शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट,या भेटीदरम्यान दोघांच्या बरोबर एकच अंगरक्षक असावा ही मुख्य अट होती,त्यावेळी छत्रपतींनी अत्यंत विश्वासाने जिवाजी महाले यांची  निवड केली. हा नाभिक समाजावर त्यावेळी  टाकला गेलेला विश्वास आज ही नाभिक समाज सार्थ करतो आहे.असे प्रतिपादन सयाजीराव झुंजार यांनी केले.
  वीर जिवाजी महाले यांची जयंती कडेगांव येथील सुरेश बाबा देशमुख चौकात आयोजित करण्यात आली होती.
  पुढे बोलताना सयाजीराव झुंजार म्हणाले की या पराक्रमाची आठवण येणाऱ्या सर्व पिढ्यांना राहण्याकरता शूरवीर जिवाजी महाले यांची स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याला होणे ही काळाची गरज आहे.असे मत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी व्यक्त केले.
      सद्यस्थितीला  समाजावर खूप अन्याय होत  ते बदल करून लोकांना अपेक्षित असलेल्या अत्याधुनिक सेवा सुविधा आपल्या गावामध्ये शहरांमध्ये उपलब्ध करून द्याव्यात हेही सांगायला ते विसरले नाहीत.
       जिल्हा कार्याध्यक्ष सतीश लोखंडे यांनी  जन सुरक्षा कायदा हा अन्यायी कायदा रद्द करून भविष्यातील सामाजिक शांतता राहावी याकरिता महिला समुपदेशन सारखी सामाजिक शांतता समुपदेशन केंद्र शासनाने चालू करावीत अशी मागणी केली.
या वेळी जिल्हा अध्यक्ष जयवंतराव  सूर्यवंशी, अपर्णाताई देशमुख भाजपा जेष्ठ नेते चंद्रसेन देशमुख मेघाराणी जाधव, विजय शिंदे, डी. एस. देशमुख, चंद्रसेन देशमुख, यांनी मनोगत व्यक्त केले 
कार्यक्रमास यावेळी माजी सभापती ,मंगलताई क्षीरसागर, युवा नेते दिग्विजय कदम, सुरेशचंद्र थोरात, बापूराव देशमुख, सुनील गाढवे,दादासो माळी, वैभव देसाई, भाऊसाहेब यादव,प्रवीण करडे,गजानन सपकाळ, आर के रोकडे, राजू काळे,संतोष खंडागळे, अनिल बने,श्रीकांत जाधव, प्रवीण क्षीरसागर, प्रवीण सूर्यवंशी,राम बनकर, श्रीधर वाघमारे, नंदू सपकाळ यांचे सह हजारो नाभिक बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
 सकाळी दोन तास ढोल ताशाच्या गजरात शूरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक संपूर्ण शहरातून काढणेत आली
स्वागत  रवींद्र पवार यांनी  केले. सूत्रसंचालन आकाश पाटील यांनी तर आभार संभाजी जाधव यांनी मांडले.

फोटो ओळ कडेगांव येथे वीर जिवाजी महाले यांची जयंती कार्यक्रमास बोलताना सयाजीराव झुंजार व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा