कडेगांव पोलिस ठाण्याचा नुतन पोलिस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी पदभार स्विकारला
कडेगांव पोलिस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी पदभार स्विकारला.
कडेगांव पोलिस स्टेशन मधील पोलिस निरीक्षक शेवाळे यांची बदली तासगाव पोलीस स्टेशनमध्ये झाली असून नवीन अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे यांनी पदभार स्विकारला आहे.
कडेगांव पोलिस स्टेशन हे सांगली जिल्ह्यातील शांत पोलिस स्टेशन मध्ये गणले जातात.केवळ निवडणूका वेळी थोडाफार राजकीय संघर्ष होतो नाहि तर एरवी कमी गुन्हे, दरोडा,चोरी, मारामारी हे प्रमाण जिल्ह्यातील इतर पोलिस स्टेशनच्या मानाने कमीच आहे.
नवीन सहायक पोलिस निरीक्षक गणेश कोकाटे यांना छोट्या मोठ्या चोऱ्या, शेतकरी यांच्या शेतातील मोटार चोरी तसेच नव्याने निर्माण होणारे कमी वयातील तरुण यांना गुन्हेगारी पासून रोखणे हेच काम राहणार आहे.नव्या फाळकुट दादांची निर्मिती होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
फोटो सहायक पोलिस निरीक्षक गणेश कोकाटे.