स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीने लढणार : संग्रामसिंह देशमुख " आसद विविध विकासकामाचे भूमिपूजन संपन्न.




सांगली/कडेगाव:

      जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सांगली जिल्हा परिषदेमध्ये पक्षविरहित काम करून मोठा निधी पलूस कडेगाव साठी उपलब्ध करून भागाचा खऱ्या अर्थाने कायपालट केला असून आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचे विचार व कार्य तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून भाजपा म्हणून एकसंघ व एकदिलाने काम करून भाजपाचे सर्व उमेदवार निवडून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.
       ते आसद ता. कडेगाव येथील विविध विकासकामाच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते. यावेळी क्रांतीअंग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह.साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड, तानाजी भाऊ जाधव, टी. एम. जाधव सर, बाळासाहेब होनमाने, राजाराम यादव, पपीता ताई सुतार, विजय जाधव, आनंदराव जाधव, संतोष बापू माने, प्रभाकर साळवी, धनाजी यादव, शिवाजी काका मोहिते, फटेराव मोहिते, माणिक मोरे, आशिष मोरे, अधिक जमदाडे, सद्दाम मुल्ला, उदय पाटील, प्रदीप पाटील प्रमुख उपस्थित होते.

    यावेळी आसद येथील श्री गणेश मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लक्ष, जि.प.शाळा दुरुस्ती करणे ६ लक्ष या विकास कामांचे भूमिपूजन संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते व शरद लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 

       यावेळी बोलताना शरद लाड म्हणाले मी जिल्हा परिषद सदस्य असताना संग्रामभाऊ देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते. त्यावेळी कडेगाव व पलूस अश्या दोन्ही पंचायत समितीवर, नगरपंचायतीवर  आपली सत्ता होती सर्व जिल्हा परिषद सदस्य आपले होते. या कार्यकाळात पलूस कडेगाव च्या जनतेने खरा विकास पाहिला आहे आता केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने निधी वाटपासाठी वाडपीच आपला असल्याने विकासाठी निधी कमी पडणार नाही  त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ताकदीने व एक दिलाने काम करून भाजपाचे उमेदवार निवडून देण्याची ग्वाही शरद लाड यांनी दिली.
      यावेळी निकम सर, सुधीर मोहिते, भानुदास जाधव, हरी जाधव, संदेश जाधव, सतीश जाधव, संदीप पाटील, ऋषिकेश मोहिते, भगवान मुळीक, लक्ष्मीण जाधव, माणिक जाधव, नितीन जाधव, पृथ्वीराज देशमुख, चंद्रकांत पाटील यांच्या सह आसद परिसरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ.
आसद ता. कडेगाव येथील विविध विकासकामाच्या भूमिपूजनाप्रसंगी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, क्रांतीअंग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सह.साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्या सह अन्य.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा