सरस्वती स्कूल, कडेपूर येथे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न



सांगली/कडेपूर:
विद्यार्थ्यांना शिक्षण व करिअर निवडीबाबत योग्य दिशा मिळावी या उद्देशाने सरस्वती स्कूल, कडेपूर येथे दि. ०७/०१/२०२६ रोजी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना इयत्ता ८ वी ते १२ वी नंतर उपलब्ध असलेले शिक्षणाचे मार्ग, स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम, कौशल्याधारित शिक्षण व करिअरच्या संधी याबाबत सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टे लक्षात घेऊन वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व मार्गदर्शकांना अनेक प्रश्न विचारून आपल्या शंका दूर केल्या. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिक्षण विस्तार अधिकारी चव्हाण आर ए, केद्रप्रमुख कडेपूर महादेव माळी सरस्वती स्कूलच्या मुख्याध्यापक सुमिता सूर्यवंशी व सर्व शिक्षकवर्गाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा