चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूलला माजी शिक्षक आमदार भगवानराव आप्पा साळुंखे यांची भेट
चिंचणीतील श्री शिवाजी हायस्कूलला माजी शिक्षक आमदार भगवानराव आप्पा साळुंखे यांची भेट
कडेगांव/चिंचणी :
कडेगांव तालुक्यातील चिंचणी (अं .) येथील श्री शिवाजी हायस्कूल मध्ये 'शिक्षण वाचवा ,देश वाचवा' या जनसमर्थन अभियान २०२५-२६ चे अभियानाचे प्रमुख माजी शिक्षक आमदार भगवानराव आनंदराव साळुंखे (आप्पा )यांनी भेट दिली.
यावेळी आ.भगवानराव आप्पा म्हणाले की,सर्व सामान्य मुलांची शाळा व शाळेतील शिक्षक टिकवण्यासाठी सर्व शिक्षकांनी संघटन करून सुसंवाद करून तातडीच्या मागण्या कृती आराखडे द्वारे समाजातील सर्व घटकांच्या पाठीब्यासह मागणीपत्रकाचे सादरीकरण करुन केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत काही महत्त्वपुर्ण मुलभूत धोरणात्मक बदलांसाठी
"शिक्षण वाचवा , देश वाचवा व जनसमर्थन अभियान " २०२५-२६ चा प्रारंभ केला असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक अरुण सावत, पर्यवेक्षक सतीश मेटकरी,जेष्ठ शिक्षक उमाकांत सांवत तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.