क्रांतीवीर भाई भगवानराव पाटील यांचे कार्य राज्याला दिशादर्शक: दिपक पवार

क्रांतीवीर माजी आमदार भगवानराव पाटील यांचे कार्य राज्याला दिशादर्शक : दीपक पवार 

क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ मध्ये क्रांतिवीर पाटील यांची जयंती साजरी 
 

सांगली /कडेगांव: 

८२ वर्ष आयुष्य लाभलेल्या क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील यांचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात  केलेले काम राज्याला दिशादर्शक आहे , असे गौरवोद्गार प्रेरणादायी वक्ते, पत्रकार दीपक पवार यांनी काढले. 
   येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ मध्ये क्रांतिवीर, स्वातंत्र्यसेनानी, भाई , माजी आमदार भगवानराव पाटील यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अॅड. सुभाष पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष पवार, संचालक प्रा. विलासराव पाटील, देवकुमार दुपटे प्रमुख उपस्थित होते. 
   श्री. पवार म्हणाले,  क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी.बापू. नागनाथ आण्णा नायकवडी ,  भाई भगवानराव पाटील, हौसाताई पाटील यांंनी केलेल्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांची जाणिव सतत आपण ठेवली पाहिजे. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटचालीवर आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 
   ते म्हणाले, भाई भगवानराव पाटील यांनी केवळ देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला नाही. तर स्वातंत्र्योत्तर काळात समाजामध्ये रचनात्मक कार्य केले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात बळवंत महाविद्यालय, विटा  हायस्कूल, भैरवनाथ वस्तीगृह या सारखी शैक्षणिक दालने सुरू केली. त्यांनी केलेल्या संघर्षातून येरळवाडी धरणाची निर्मिती झाली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांना कारावास झाला होता. १९५७ साली आमदार झाले. विधानसभेत कष्टकरी,  शेतकरी, कामगार यांच्या न्याय मागण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या सामाजिक कार्याची सतत आठवण  ठेवणे आवश्यक आहे. 
अॅड. पाटील म्हणाले, माझे वडील म्हणून भगवानराव पाटील यांचा मला अभिमान आहेच. त्यांनी केलेले संस्कार हे आयुष्य भर प्रेरणा देत राहिले. हैद्राबाद  संग्राम मध्ये त्यांनी रचनात्मक काम केले. 
    दरम्यान, प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर भगवानराव पाटील, क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
    यावेळी शकुंतला पवार ,    कांबळे , सोनवणे यांंच्या पालक, विद्यार्थी उपस्थित होते. तेजस्वी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यांनी सूत्रसंचालन केले. यांनी आभार मानले. 
 : दुसऱ्यांची काळजी घेणारे भगवानराव बप्पा : 
क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील यांंचे २००० साली निधन झाले. निधनाच्या दोन दिवस अगोदर विट्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्याच दरम्यान, विटा शहरातील लोक विद्यापीठाच्या इमारतीचे बांधकाम सुरु होते. इमारतीवर कैच्या बसविण्याचे काम चालू होते. त्यांनी पाहिले  उंचीवर मजूर काम करत होते. त्यांनी सांगितले,एक दिवस काम उशीर झाले तरी चालेल पण मजूरांना कोणतीही दुखापत होता कामा नये. अशा पध्दतीने दुसऱ्याची काळजी घेणारे बप्पा होते. अशी आठवण सांगताना सुभाष पाटील यांचा कंठ दाटून आला. 
....

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा