187वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या कडेगाव येथिल श्रीराम मंदिरात यंदाच्या वर्षी श्रीराम जन्मोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले आहे :-देवस्थानचे अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी
सांगली /कडेगाव न्युज:
कडेगांव येथील १८७ वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्री राम मंदीरात यंदाच्या वर्षी श्री राम जन्मोत्सव सोहळ्याचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. अशी माहीती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष प्रा दिपक कुलकर्णी यांनी कडेगांव चौफेरशी बोलतना दिली.
हा १८७ वा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास चैत्र शु॥ प्रतिप्रदा गुरुवार दि.१९ । 0३ / २०२६ पासुन ते चैत्र शु॥ एकादशी रविवार दि. २९ /० ३ । २ ०२६ अखेर संपन्न होत असून उत्सव काळात परंपरेनुसार चालत आलेल्या अनेक भक्तीमय कार्यक्रमा बरोबर नामवंत विद्वानांची प्रवचने, भजने, गीत गायन, किर्तने आयोजित केली आहेत.
या शिवाय या ऐतिहासिक श्रीराम जन्मोत्सवाची सुरवात चैत्र शु.प्रतिपदा गुडीपाडवा गुरूवार दि.19/03/2026 रोजी ध्वजारोहण करून शुभारंभ करण्यात येणार असल्याचे माहीती देवस्थानचे अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी यांनी सांगितली.त्याच बरोबर उत्सवकाळातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकड आरती,सकाळी 8वा.महपुजा,सकाळी 9वा.छबिना व प्रदक्षिणेच्या आरत्या दुपारी 11वा.श्री अभयजी माटे पुणे यांचे रामायण वाचन दुपारी 12.30वा.महाप्रसाद,दुपारी 4.30ते 6.30प्रवचन,भजन व गीतगायन,सायं.6.30ते 7.30 पंचपदी, रात्री 7.30ते 8.30 छबिना,रात्री 9वा.ते 12वा.पर्यंत संगीत विशारद,संगीत नाटक कलाकार ह.भ.प.सौ.सायली मुळ्ये-दामले रत्नागिरी यांचे सुश्राव्य किर्तन असा दैनंदिन कार्यक्रम परंपरेनुसार होत असतात.याशिवाय या उत्सवातील प्रमुख कार्यक्रम म्हणजे 360किमीची चार महीनेकालावधीची नर्मदा परिक्रमा सलग 108दिवसात यशस्वीरित्या पुर्ण करणारे आपल्या कडेगाव तालुक्यातील श्री सदाशिव उर्फ नामदेव देशपांडे यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.त्याच बरोबर शनिवार दि 21/03/2026 रोजी रत्नमय लिखित निखळ विनोदी एकपात्री प्रयोग हास्यगंध सादरकर्ते अनेकांनी गौरविलेले झी मराठी चला हवा येऊद्या फेम वृषभ आकिवाटे धामणी जि सांगली याचा एकपात्री प्रयोग तसेच मंगळवार दि 24/03/2026 रोजी अलापिनी महीला भजनी मंडळ सांगली यांचे तब्बल पाच संगीत विशारदाचा सहभाग असलेल्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा अनेक विविध कार्यक्रमाचा लाभ श्रीराम भक्तांनी व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी यांनी केले आहे.या दहा दिवस चालणाऱ्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता रविवार दि.29/03/2026 रोजी
परंपरेप्रमाणे प्रभु श्रीरामचंद्राच्या मुर्ती,श्रीराम पंचायतन यांची भव्य आकर्षक सजावट केलेल्या रथातुन कडेगाव शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणुक काढण्यात येणार आहे.तरी या मिरवणुकीत सर्व ग्रामस्थ रामभक्तानी उपस्थित रहावे असे अवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी देवस्थानचे सचिव मकरंद रणभोर,श्रीकांत देशपांडे,वसंत इनामदार,चंद्रकांत देसाई,सचिन कुलकर्णी,सुहास देशपांडे,मुकुंद कुलकर्णी,विश्वास व्यास,नामदेव देशपांडे,गिरीष देशपांडे यांच्यासह तानाजीराव भोसले, आप्पासो चव्हाण,प्रदिप शेटे उपस्थित होते.