कडेगावच्या श्रीराम जन्म सोहळ्यास 187वर्षाची ऐतिहासिक परंपरा!!

कडेगावच्या श्रीराम जन्मसोहळ्यास 187 वर्षाची ऐतिहासिक परंपरा..
सांगली जिल्ह्यातील कडेगाव सारख्या एका गावाने सलग 187 वर्षाची अशीच एक परंपरा जोपासली आहे व ती जोमाने चालविली वाढवली आहे.ती म्हणजे श्रीराम जन्म सोहळा! आयोध्येसारख हे कडेगाव मोहरत.अशी 187वर्षाची परंपरा श्रीराम मंदीरात अविरतपणे अखंड चालु आहे.यावर्षी या जन्मसोहळ्यास कडेगाव पलुस मतदार संघाचे तरूण तडफदार आमदार माजी मंत्री डॉ.विश्वजित कदम उपस्थित रहाणार आहेत.मागील वर्षी आमदार डॉ.विश्वजित कदम यांनी रथगृहाच्या जिर्णोध्दारासाठी आमदार फंडातुन 10 लाख रूपये बहाल केले होते त्या रथगृहाचे भुमीपुजन श्रीराम जन्मोहत्सवा दिवशी आयोजित करण्यात आले आहे.अशी माहीती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी यांनी दिली.
आमदार माजी मंत्री डॉ.विश्वजित कदम,सुरेशचंद्र थोरात,दिपक भोसले,सागर सुर्यवंशी,पत्रकार हेमंत व्यास.शांताराम दिक्षित,आकाश धर्मे.
श्रीराम जन्मकाळ झाल की वसंत पुजा करण्यात येते नंतर किर्तन व महाप्रसाद देण्यात येतो.अशा या श्रीराम जन्मसोहळ्याचा आनंद घेण्यासाठी रामभक्तानी श्रीराम मंदिरात उपस्थित रहाण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी मंडळाचे जेष्ठ ट्रस्टी रमेश शिराळकर,दत्तात्रय पाठक,कालीदास देशपांडे यांच्यासह मुकुंद कुलकर्णी,विश्वेश इनामदार,आप्पासाहेब चव्हाण,सचीन कुलकर्णी,अतुल रत्नाकर,गिरीश कुलकर्णी,प्रथमेश दिक्षित,प्रविण रणभोर,अनिकेत पवार,प्रदिप शेटे यांच्यासह महीला,ग्रामस्थ उपस्थित होते.
मंडळातील महीलाची श्रीराम नवमीची लगबग..

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा