स्मार्ट मिटर निषेधार्थ भव्य मार्चा काढणार:सामाजिक कार्यकर्ते डी एस देशमुख.
स्मार्ट मीटर निषेधार्थ मोर्चा काढणार:डी एस देशमुख
स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवू नये; जबरदस्तीने बसवलेले स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवावे अन्यथा जबरदस्तीने मीटर बसविणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा .
तसेच कडेगाव शहरातील गेले ४० ते ५० वर्षापूर्वी बसविलेले व सध्या वाकलेले पोल ; तारा डीपी फुज मुदतबाह्य झाल्याने लाईट जाते तरी सर्व मुदतबाह्य सामान नवीन बसवावे. कडेगाव शहर भागात शेतीसाठी व घरगुती लाईट खंडित होऊ नये अशी व्यवस्था करण्यात यावी अश्या मागणीसाठी महावितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले.
शेतीसाठी नवीन वीज कनेक्शन देण्यात यावे.
वरील कार्यवाही करावी व लेखी ठोस आश्वासन न दिल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर येत्या २५ मार्च रोजी भव्य मोर्चा काढणार असल्याचे पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख यांनी सांगितले. तसेच न्याय मिळाला नाही तर २९ एप्रिल रोजी डी पी स्थळी जाऊन उलटे टांगून घेऊन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले
यास शासन प्रशासन जबाबदार राहील.यावेळी वैभव देसाई ;पाणी संघर्ष समिती संयोजक अभिमन्यू वरुडे;पदाधिकारी संजय तडसरे;जीवन करकटे ;मोहन जाधव;आप्पा यादव ;किरण चव्हाण;पोपट मोरे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.