ध्वजारोहणाने श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची सुरवात

कडेगाव न्युज:-
ऐतिहासिक 187वर्षाची परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची सुरवात चैत्र शु.प्रतिपदा (गढीपाडवा) दिवशी सकाळी 9वा.कडेगावचे प्रांत अधिकारी रणजित भोसले साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली यावेळी देवस्थानचे अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी,उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे,सचीव मकरंद रणभोर,अभय माटे जेष्ठ सभासद अशोकराव कुलकर्णी,मुकुंदा कुलकर्णी डि के पाठक उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकरी रणजित भोसले यांचा सत्कार देवस्थानचे ट्रस्टी अभयजी माटे यांनी शाल श्रीफळ देऊन केला.यावेळी देवस्थान मंडळाचे सभासद कालीदास देशपांडे,विलास हावलदार,सुहास हावलदार,विश्वेश इनामदार,ऋषिकेश देशपांडे,आप्पासाहेब चव्हाण,सोमनाथ देशमुख,विघ्नेश पळसुळे,हेमंत कुलकर्णी,प्रदिप शेटे दशरत चन्ने संतोष चव्हाण,चैतन्य पाठक,दिग्विजय कुलकर्णी,शिवाजी चन्ने,मा.नगरसेवक राजेंद्र राऊत,उपस्थीत होते आभार वसंत ईनामदार यांनी मानले.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा