श्रीराम जन्मोहोत्सवात किर्तनकार,तबलावादक व पेटीवादक यांच्यात रंगली जुगलबंदी

कडेगाव येथील श्रीराम जन्मोत्सवात  महोत्सवात कडेगाव येथील प्रसिध्द तबला वादक राम शिंदे  आणि पेटीवादक श्री अशोकराव कुलकर्णी  यांच्या गेली 50 वर्षाहुन अधिक काळ विना मोबदला सेवा बजावतात. अशा या  दहा दिवस चालणाऱ्या उत्सवातील किर्तनात तबला वादक राम शिंदे व पेटी वादक अशोकराव कुलकर्णी तबला,पेटी व किर्तन कार यांच्याजबरदस्त जुगलबंदीने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.किर्तनकार    ह.भ.प.सौ.सायली मुळ्ये /दामले या तीघाच्याही सुरांचा आणि तालांचा हा अनोखा मिलाफ ऐकताना उपस्थित रसिक अक्षरशः हरखून गेले जातात.
संगीत विशारद,गायक श्री अशोकराव कुलकर्णी.

 त्यानंतर, तीनही कलाकारांनी एकमेकांवर मात करणारे तालाचे आणि स्वरांचे तुकडे सादर केले. पेटीवादक अशोकराव कुलकर्णी यांनी आपल्या बोटांच्या चपळाईने सुरांना धार लावली, तर तबलावादक राम शिंदे यांनी पडणाऱ्या प्रत्येक थापेवर किर्तनाची रंगत वाढवली.
तबला वादक रामभाऊ शिंदे.

या तिघाच्या जुगलबंदीमध्ये त्यांनी अशा विविध तालांमधील रचना सादर केल्या. संवादात्मक शैलीत  सादर झालेल्या या जुगलबंदीत कधी तबला पुढे, तर कधी पेटी पुढे, तर कधी किर्तनकार सायली मुळ्ये यांचा सुरेल आवाज पुढे असे दृश्य वारंवार पाहायला मिळाले.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा