भारती विद्यापिठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी,आणि उद्यानविद्या महाविद्यालय कडेगाव येथील कृषी पदवी आणि विद्यानविद्या पदवी प्रवेशित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न!!

*डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती वितरण सोहळा..*
कडेगाव 30 मार्च, भारती विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी आणि उद्यानविद्या महाविद्यालय कडेगाव येथील कृषी पदवी आणि उद्यानविद्या पदवी प्रवेशित गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा सोमवार दि. 30 मार्च रोजी संपन्न झाला. डॉ. पतंगराव कदम शिष्यवृत्ती कृषी महाविद्यालयातील एकूण 08 गुणवंत विद्यार्थ्यांना तर उद्यानविद्या महाविद्यालयातील एकूण( 04) विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. प्रत्येक वर्गामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला रुपये दहा हजार तर द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपये 5000 तसेच मेरिट प्रमाणपत्र ,मेमेंनटो तसेच डॉ. पतंगराव कदम साहेबांच्यावर महाराष्ट्र शासनाने व डॉ महादेव सगरे लिखित महाराष्ट्राचे शिल्पकार डॉ. पतंगराव कदम हे पुस्तक विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथ म्हणून भेट देण्यात आले . विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे व उपस्थितीच्या हस्ते करण्यात आला.
डॉ.पतंगराव कदम शिष्यवृत्ती प्रधान सोहळ्याची सुरुवात भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्व.डॉ.पतंगराव कदम आणि सरस्वती फोटो पूजनाने झाली. सदर शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याकरिता कडेगाव विभागाचे प्रांताधिकारी, रणजीत भोसले,  श्री. सागर कुलकर्णी, नायब तहसीलदार कडेगाव व मा.श्री.आदित्य (भैया) कदम संचालक सोनहिरा ऍग्रो सायन्सेस लि. तथा मुख्य कृषी अधिकारी कृषी महाविद्यालय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद प्राचार्य डॉ.अधिकराव जाधव यांनी भूषवले तर डॉ. रणवीर पवार (उपप्राचार्य शिक्षण) डॉ. युवराज जाधव (उपप्राचार्य प्रशासन) डॉ. चारुदत्त औताडे , विद्याशाखा प्रमुख (कृषी) व डॉ.विकास घार्गे (उद्यान विद्या), आदी उपस्थित होते.
मान्यवरांची ओळख व कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. युवराज जाधव यांनी केली तद्नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 
सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे श्री सागर कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या आयुष्यातील खडतर प्रवासामध्ये अनुभवलेले किस्से सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सदैव प्रयत्नशील राहावे नेहमी झगडावे तसेच संघर्ष करणे गरजेचे असल्याचे सांगितले. विद्यार्थी दशेत स्वतःचे अंतर्गुण ओळखावे व त्याला चालना देणे हीच खरी यशाची सुरुवात आहे असे सांगितले. युवा वर्गांनी नित्यनेमाने सकाळी लवकर उठावे प्राणायाम करावे जबाबदारीचे भान ठेवावे म्हणजे जीवनात यश संपादन करण्यात मदत मिळेल. शेवटी मा.श्री. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी वर्तमानात जगा व स्वतःसाठी वेळ काढा, आत्मबल वाढवा असा कानमंत्रही दिला.
सदर शिष्यवृत्ती सोहळ्यामध्ये उपस्थित अंतिम वर्षातील गुणवंत विद्यार्थीनी कु. हिरकणी शेजवळ हिनेदेखील शैक्षणिक जीवनातील तिचा संघर्षमय प्रवास स्पष्ट करत महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक रुंद यांचे आभार मानले व संघर्षमय जीवनात यश संपादन करताना वेळोवेळी प्राध्यापकांनी मार्गदर्शन करत लढण्याची ताकद दिल्याचे सांगितले. तसेच उद्यानविद्या महाविद्यालयातील कु. सायली महाडिक हिनेदेखील महाविद्यालयांमध्ये वेळोवेळी मिळत असलेले बहुमोल मार्गदर्शनच माझ्यासाठी यश संपादन करण्यासाठी कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले. 
पुढे आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अधिकराव जाधव यांनी विद्यार्थीदशेत वेळेचे महत्व पटवून दिले यासाठी त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे उदाहरणे ही विद्यार्थ्यांकरीता स्पष्ट करण्यात आले. डॉक्टर पतंगराव कदम शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांकरिता संघर्षमय जीवनातील यशाची पोहोच पावती असल्याचे त्यांनी सांगितले. यश संपादन करण्यासाठी गर्व जोपासू नये त्याऐवजी स्वतः शिस्तबद्ध रहावे असा कानमंत्रही दिला. विद्यार्थ्यांनी नेहमी अर्थपूर्ण रहावे व नैतिक मूल्ये जपत यश संपादन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. शिष्यवृत्ती वितरण सोहळ्याचे आयोजन महाविद्यालयातील कृषी विस्तार शिक्षण व विद्या शाखा विभाग यांनी केले होते सदर सोहळ्यासाठी प्रा. रमेश पवार, डॉ.धनश्री निगडे, डॉ. गोविंद शिवरकर यांनी परिश्रम घेतले. सदर गुणवंत सोहळ्या करिता सूत्रसंचालन प्रथम वर्ष प्रवेशित (कृषी) विद्यार्थिनी कु. दिपाली सुतार यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार डॉ. चारुदत्त औताडे यांनी मानले.


Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा