कडेपुर येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जहान्गीर मुलाणी वपंढरीनाथ यादव यांच्या प्रामाणिक पणामुळे 2लाख 12हजार पाचशे रूपयेची रस्त्यात पडलेली पीशवी मुळ मालकास परत केली

सांगली /कडेपुर न्युज:-
कडेपूरचे सुपुत्र व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी* *आदरणीय श्री.  जहांगीर इब्राहिम मुलाणी ( चाचा साहेब ) व आदरणीय श्री. पंढरीनाथ उर्फ बाबुराव यादव* या दोघांनी रस्त्यावर पडलेली *दोन लाख बारा हजार पाचशे (२,१२,५०० /-)* रुपयांच्या रक्कमेची पिशवी अत्यंत प्रामाणिकपणे ,  कडेगाव पोलीस ठाणे येथे जाऊन व मूळ मालक तोंडोली येथील श्री. हर्षवर्धन मोहिते  यांना पोलिसांच्या मदतीने परत केली त्यांच्या या प्रामाणिकतेबद्दल कडेगाव पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी व  सर्व स्टाफच्या वतीने त्या दोघांचेही अभिनंदन करण्यात आले. जरी एखादा पोलीस अधिकारी सेवानिवृत्त झाला असेल तरीही तो आपले वर्दीतील कर्तव्य कधीच विसरत नाही हे पुन्हा एकदा  जहांगीर इब्राहिम मुलाणी (चाचा साहेब) यांच्या कृतीने समाजाला दाखवून दिले आहे. प्रत्येक वर्दीत एक प्रामाणिक , कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी दडलेला असतो तो नेहमी आपली सामाजिक बांधिलकी जपत असतो, मग तो कर्त्यावर असताना अथवा सेवानिवृत्त झाल्यावर  देखील... आपले पोलीस वर्दीतील कर्तव्य पार पाडत असतोच. *त्यांच्या या कृतीमुळे समस्त ग्रामस्थ कडेपुर यांची मान अभिमानाने उंचावली गेलेली आहे .... त्याबद्दल दोघांचेही सरपंच , उपसरपंच , सर्व सदस्य ग्रामपंचायत कडेपुर ग्रामपंचायत , पोलीस पाटील कडेपूर व समस्त ग्रामस्थ कडेपूर यांच्यावतीने मनापासून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ...

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा