गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्या : डॉ.पौर्णिमा शृंगारपुरे

गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्या : डॉ.पौर्णिमा शृंगारपुरे 
:चिंचणीतील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये जनजागृती व आवाहन
   सांगली /कडेगाव :-    
 गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक लस १४ वर्षे पूर्ण असणाऱ्या मुलींसाठी मोफत आहे. अमेरिकेमध्ये १९७० पासून लस दिली जाते. तेव्हा कसल्याही प्रकारचा गैरसमज न बाळगता लसीकरणाला साथ द्या. लसीकरण करुन घ्या, असे आवाहन चिंचणी (अं.)येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे यांनी केले.
           कडेगांव तालुक्यातील चिंचणी (अं .)श्री शिवाजी हायस्कूलमध्ये गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण समज-गैरसमज याविषयी जनजागृती कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापक अरुण सावत अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.ललिता पाटील, डॉ .योगिता कुंभार,ज्योती शिंदे,
रुपाली महाडीक,सौ.सुरेखा माळी,सह्याद्री पतसंस्थेच्या चेअरमन पल्लवी मोहिते,पर्यवेक्षक सतीश मेटकरी होते. 
         यावेळी अरुण सावत यांनी लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी डॉक्टर ललिता पाटील म्हणाल्या, विषाणूंमुळे होणारा हा आजार आहे. गर्भाशय कॅन्सरची कारणे, लक्षणे जाणून घ्या. आजार होवू नये म्हणून प्रतिबंध हाच उपाय आहे तेव्हा शासनामार्फत सुरू झालेल्या मोफत लसीकरण योजनेचा लाभ घ्या.
          
या कार्यक्रमास इयत्ता सातवी, आठवी व नववीच्या मुली तसेच माता-पालक यांसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन गोरखनाथ घुगे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक राजेश महाडीक यांनी केले तर आभार ए.वाय.शिकलगार यांनी मानले.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा