सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनचा भव्य मेळावा दिमाखात संपन्न

सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनचा भव्य मेळावा संपन्न* 
एकाच वेळी सातशे शाखांचा दिमाखात शुभारंभ..!

सांगली/ कडेपुर:-

समाज, सैनिक आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी समर्पित भावनेने काम करण्याचे ध्येय घेऊन सैनिक शेतकरी फाउंडेशनचा सांगली जिल्ह्यातील तालुक्यांच्या 700 शाखांचा शुभारंभ  सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेजर मा. मनोजकुमार डांगे यांच्या हस्ते मोठया दिमाखात झाला.
या कार्यक्रमासाठी फाउंडेशनचे उपाध्यक्ष निलेश निकम, सचिव संजय सतई, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश पाटील, महिला सक्षमीकरणच्या स्वाती बोराटे,  जिल्हाध्यक्ष जयंत मैदानकर महिला जिल्हाध्यक्ष सौ मनीषा वाघमोडे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
सैनिक शेतकरी वेलफेयर फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवा तसेच, विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थापक मनोजकुमार डांगे यांनी सांगितले. सैनिक शेतकरी सुकन्या योजना,अंतिम सन्मान योजना, आरोग्य योद्धा उपक्रम, व्यसनमुक्ती, कचरा मुक्त भारत, अशा विविध योजनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण करून महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील लोकांना सेवा सुविधा पोहचवण्यासाठी सैनिक आणि शेतकऱ्यांनी संघटन वाढीसाठी योगदान दयावे असे आवाहन माननीय डांगे साहेब यांनी केले.
यावेळी, महाराष्ट्रात पाच हजार पेक्षा अधिक शाखा असणाऱ्या सैनिक शेतकरी वेल्फेअर फाउंडेशन ने सांगली जिल्ह्यात एकाच वेळी 700 पेक्षा जास्त शाखांचा शुभारंभ करून नवा इतिहास घडवला असल्याचे प्रतिपादन श्री.नारायण वाघमोडे (मीडिया प्रमुख ) यांनी केले.
या मेळाव्यासाठी सैनिक शेतकरी फाउंडेशनचे तासगांव तालुकाध्यक्ष संजय (दाजी) चव्हाण, साधना पाटील, विजय पाटील, खानापूर तालुकाध्यक्ष योगेश मेटकरी, निशा साळूंखे, जत तालुकाध्यक्ष संदीप सोलणकर, स्वाती माने, कवठेमहांकाळ अध्यक्ष बाळासो शिंदे, महिला तालुकाध्यक्ष वैशाली मुडदे, वाळवा तालुकाध्यक्ष चेतन चव्हाण, शिराळा - प्रभावती चव्हाण, आटपाडी तालुकाध्यक्ष रमेश कातुरे, संगीता मेटकरी यांचेबरोबरच या शुभारंभ मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रत्येक गावातून महिला आणि युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

Popular posts from this blog

अजब गजब...कडेगांव शहरात रास्कर कुटुंबाने धुमधडाक्यात केले गायीचे डोहाळे जेवण.

राष्ट्रीय परिषदेत कडेगांव शहराचे विद्यमान नराध्यक्ष धनंजय देशमुख व उपनराध्यक्ष पै.अमोल डांगे यांचा सहभाग

श्री शिवप्रभु प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा