सरस्वती ग्लोबल स्कुलचा सी बी एस ई बोर्डाचा शंभरटक्के निकाल.
कडेपुर : सरस्वती ग्लोबल स्कूलचा CBSE बोर्डाचा शंभर टक्के निकाल
कडेपुर येथील सरस्वती ग्लोबल स्कूलने यंदाच्या शैक्षणिक वर्षात उज्ज्वल यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक वरद सूर्यवंशी 97. 60%, द्वितीय क्रमांक राजवर्धन पवार 97.40% तृतीय क्रमांक अथर्व मोरे 96. 20% तसेच 90% विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून पास.
या यशामध्ये विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा मोलाचा ठरला आहे. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उच्च गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले आहे.
शाळेचे संस्थापक मा. पृथ्वीराज बाबा देशमुख, शाळेचे चेअरमन रविराज दादा देशमुख, तसेच सचिव मॅडम वृषाली देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुमिता सूर्यवंशी आणि शिक्षकवर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच येणाऱ्या काळातही अशीच यशाची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या उल्लेखनीय यशामुळे परिसरात शाळेचे कौतुक होत असून, सरस्वती ग्लोबल स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.