जिल्हा न्यायाधीशपदी निकिता डोंब यांची निवड झाल्याबद्दल युवा नेते संग्रामसिह देशमुख यांच्या शुभहस्ते सत्कार "
जिद्द चिकाटी परिश्रमाची तयारी असल्यास यश निश्चित संग्राम संपतराव देशमुख.
सांगली / कडेगाव न्युज :-
एखाद्या अपयशाने न खचता ध्येय निश्चित करून त्यासाठी परिश्रमाची तयारी केल्यास व प्रयत्नात सातत्य असल्यास जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळते असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम संपतराव देशमुख यांनी केले ते निमसोड ता. कडेगांव येथील प्रगतशील शेतकरी आनंदराव डोब यांनची कन्या निकिता आनंदराव डोब यांची एमपीएससी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून जिल्हान्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते.
यावेळी कडेगावचे माजी उपनगरध्यक्ष विजय गायकवाड, भाजपाचे कडेगांव शहराध्यक्ष माजी नगरसेवक संदीप गायकवाड, नंदकुमार मुळीक, संजय मुळीक,सयाजीराव चव्हाण, दादासाहेब यादव, हिंदुराव यादव, संग्राम यादव, सूर्याजी यादव प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले की खरंतर ही आपल्या तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. निमसोड सारख्या छोट्याशा खेडेगावात राहून एवढ्या मोठ्या पदाला गवसणी घातल्यामुळे निमसोडच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याने ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही एक प्रेरणा ठरणार असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी निकीता डोंब यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या मेहनतीचा गौरव करत कर्तव्यदक्ष भूमिका पार पाडण्याच्या शुभेच्छा देत उल्लेखनीय यशाबद्दल सत्कार केला.
प्रत्येकाने सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने जिद्द, चिकाटी व मेहनतीवर सातत्य राखल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येते."